31 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरराजकीयमहाराष्ट्रभर होणार उद्धव ठाकरेंची शिवगर्जना..!

महाराष्ट्रभर होणार उद्धव ठाकरेंची शिवगर्जना..!

आजपर्यंत फक्त आदित्य ठाकरेच सभा, रॅली आणि रोड शो करत राज्यभर फिरत होते. आता मात्र शिवसेनेवर आलेली वेळ पाहता खुद्द उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाविरुद्ध मैदानात उतरण्याचे शिव-धनुष्य हाती उचलले आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या विरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाने ‘शिवगर्जना अभियाना’चा भाग म्हणून राज्यभरात रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे. ही शिवगर्जना मोहीम २६ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत मुंबईसह संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक, नेते, उपनेते, आमदार, माजी आमदार आणि युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी राज्यभरातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा प्रचार संपल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ५ मार्चला कोकणातून शिवसंवाद अभियानाला सुरुवात करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे निवडणूक आयोगाकडून मिळाल्यानंतर ठाकरे गटाने संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने शिवगर्जना अभियान सुरू केले असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रविवारपासून (दि. २६) नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अभियानाची सुरुवात होणार आहे. अभियानांतर्गत रविवारी नाशिक व लासलगाव येथे मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या Shivsena UBT Communication या अधिकृत ट्विटर हॅंडलवर याबाबतची माहीत दिली आहे.

या मेळाव्यास शिवसेना नेते अनंत गिते, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दिंडोरीचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी दिली. नाशिकच्या सातपूर येथे पपया नर्सरीजवळ सौभाग्य लॉन्स येथे दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता मेळावा होईल. ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयात व सातपूर येथे अभियानाच्या पूर्वतयारीसाठी बैठक झाली.

यावेळी सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, देवानंद बिरारी, देवा जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. लासलगाव येथे रविवारी २६ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता मनकर्णिका हॉलमध्ये मेळावा होणार आहे.

हे सुद्धा वाचा : उद्धव ठाकरे-केजरीवाल एकसाथ; मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार?

आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच, प्रकाश आंबडेकर यांची ग्वाही

निवडणूक आयोग मोदींचा गुलाम ; उद्धव ठाकरेंचा घणाघात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी