33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
HomeराजकीयUdyanraje Bhosale: रयत शिक्षण संस्थेचे नामांतर पवार शिक्षण संस्था करा; खासदार उदयनराजेंची...

Udyanraje Bhosale: रयत शिक्षण संस्थेचे नामांतर पवार शिक्षण संस्था करा; खासदार उदयनराजेंची जळजळीत टीका

रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा अशी जळजळीत टीका खासदास छत्रपती उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी केली. या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) असावा, असं ठरलंय मग यांनी अचानक असा का बदल केला, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला.

रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा अशी जळजळीत टीका खासदास छत्रपती उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी केली. या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) असावा, असं ठरलंय मग यांनी अचानक असा का बदल केला, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला. सोमवारी रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर एक आंदोलन झाले, यावेळी खासदार उदयनराजे भोसले बोलत होते.

उदयनराजे म्हणाले,  ज्यांचं काही योगदान नाही, अशा लोकांना रयतमध्ये घेतले जाते. राजमाता सुमित्राराजे भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेला जागा दिली. त्यावेळी मी लहान होतो. कर्मवीर अण्णा आणि सुमित्राराजे हे नेहमी समाजासाठी कार्यरत होते. अशा गोष्टी नेहमी माझ्या कानावर पडत. आज या संस्थेचा पूर्वीचा हेतु राहिला आहे असं वाटत नाही. रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असावा, हे ठरलंय. मग असं काय घडलं की त्यांनी एकदम बदल केला.? बदल करणारे हे कोण? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा –

Maitreya Scam Update : मैत्रेय विरोधातील लढ्यासाठी नागरिकांची गांधीगिरी; राज्यभरात धरणे आंदोलन

Eknath Shinde Camp: शिंदे गटातील आमदाराच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा; चर्चांना उधाण…

Mumbai News : रेल्वे प्रवाशाच्या बॅगेत सापडला तब्बल 2 कोटींचा मुद्देमाल! रक्कम बघून आरपीएफही दंग

‘यांनी फक्त ओढलंय’ –

ज्या लोकांचं काही योगदान नाही. तुम्ही त्यांना घेतलं नाही. हे घेणारे कोण? आम्ही दिलंय. यांनी काय दिलंय? यांनी फक्त ओढलंय… एवढं सगळं केलंय तर मग रयतचं नाव बदलून टाका. संख्या ज्याची जास्त आहे. त्याचा पक्ष.. ते इथं पण लागू करा. ज्या कुटुंबाची संख्या जास्त… पवार कुटुंबाची (Pawar Family) आहे… मग पवार शिक्षण संस्था नाव देऊन टाका… आज इथल्या लोकांच्या वेदना तुम्ही ऐकून घेणार आहात का? अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये नावाजलेल्या पवार कुटुंबीयांवर केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी