30.9 C
Mumbai
Sunday, May 14, 2023
घरराजकीयसंदीप देशपांडे हल्ला प्रकरण : महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेच्या उपाध्यक्षाला अटक

संदीप देशपांडे हल्ला प्रकरण : महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेच्या उपाध्यक्षाला अटक

आक्रमक शैलीत आपले राजकीय मुद्दे मांडणारे मनसेचे नेते संदीप देशपांडे शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी शिवाजी पार्कमध्ये असलेल्या एका टोळक्याने संदीप देशपांडे यांच्यावर स्टम्पच्या साहाय्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली होती. या प्रकरणातील आरोपींना २४ तासांच्या आत मुंबई गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. हल्ल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यातला एका व्यक्तीचे नाव अशोक खरात असून तो महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष आहे. तर दुसऱ्या आरोपीचे नाव किसन सोलंकी असे आहे. (Vice President of Maharashtra State Mathadi Kamgar Sena arrested)

संदीप देशपांडे यांनी या प्रकरणी वीरप्पन गॅंगवर संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचारात कोणती विरप्पण गॅंग आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. ‘महावीर फर्निचर’ आणि ‘ग्रेस फर्निचर’ या दोन आस्थापनांची उलाढाल कोविडच्या आधीपर्यंत १० लाख इतकी होती. मात्र, त्यानंतर त्यात वाढ होऊन ती उलाढाल करोडो रुपयांपर्यंत पोहोचली. यांना कोविड सेंटरमध्ये चादरी आणि गाद्या पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला. हा भ्रष्टाचार मी दोन दिवसांत बाहेर काढणार होतो. याचा सुगावा त्यांना लागला असेल”, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

सुरक्षा द्यायचीच असेल तर हल्लेखोरांना द्या
या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदीप देशपांडे यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी दोन पोलीस कर्मचारी सुद्धा तैनात केले. याबाबत संदीप देशपांडे यांनी सुरक्षा पुरवायचीच असेल तर ती हल्लेखोरांना पूरवा अशी उपरोधिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “माझी सरकारला विनंती आहे, की आम्ही कोणाला भीक घालत नाही आणि कोणाला घाबरतही नाही. त्यामुळे ही सुरक्षा त्यांनी काढून घ्यावी, ही माझी नम्र विनंती आहे. सुरक्षा द्यायचीच असेल, तर हल्लेखोरांना द्यावी.” हल्लेखोरांना द्यावी.”

हे सुद्धा वाचा

VEDIO : संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला का झाला? विधिमंडळातही उमटले पडसाद

मोठी बातमी : मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

तिथे हजर असतो तर संजय राऊतांना मारले असते ; संदीप देशपांडे संतापले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी