29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयविधान भवन परिसरात गणपतराव देशमुख यांचा पुतळा उभारण्याची मागणी

विधान भवन परिसरात गणपतराव देशमुख यांचा पुतळा उभारण्याची मागणी

टीम लय भारी

मुंबई : विधिमंडळातील ज्येष्ठ नेते दिवंगत गणपतराव देशमुख यांचे विचार, यांची शिकवण नव्या पिढीला होत रहावे, यासाठी विधान भवन परिसरात यांचा पुतळा उभारावा, अशी भावना विधानपरिषदेत सदस्यांनी व्यक्त केली. शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेत हा विषय उपस्थित केला होता. गणपतराव देशमुख यांच्या स्मृतींचे जतन करण्यासंदर्भात विचार विमर्श करुन निर्णय घेतला जावा, असे निर्देश सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांनी दिले.( Vidhan Bhavan , Demand for statue of Ganapatrao Deshmukh)

तसेच मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, दिवंगत गणपतराव देशमुख हे दोन्ही सभागृहाचे गुरुजी होते. त्यामुळे त्यांच्या कार्याची ओळख करुन देणारे स्मारक व्हावे. यासाठी शासन सकारात्मक असून याबाबत सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन सभापतींच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करुन यात सर्वपक्षीय आमदारांचा समावेश करण्यात यावा.

जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचं मुंबईत रजिस्टर तर गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने मुलीचं लग्न; स्पष्टीकरण देताना म्हणाले…

ओबीसींची जनगणनाच झाली नाही, केंद्राचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र; भुजबळांचा दावा

आबासाहेबांचे विधिमंडळातील भाषण ऐकून महाराष्ट्रातील अनेक प्रश्न नवीन आमदारांना समजले. अशा तत्वनिष्ठ व्यक्तीचे विधान भवन परिसरात भव्य असे स्मारक उभारावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मागील आठवड्यात केली होती. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

विधानपरिषद व विधानसभा मंडळातील अभ्यासू व जमिनीची नाळ जोडणारा नेता म्हणून माजी मंत्री गणपतराव देशमुख यांची ओळख होती. जनसामान्याचा नेता म्हणून ओळख असलेल्या आबांनी तब्बल ५५ वर्षे विधीमंडळात काम करत त्यांनी विधानमंडळाची उंची वाढविण्याचे काम केले. त्यांच्यासारखा नेता विधानमंडळाला लाभला हे आपले भाग्य आहे.

वाढदिवसानिमित्त ऑनलाईन शुभेच्छा द्या : जयंत पाटील

Year-ender 2021: Political leaders from Maharashtra who passed away in 2021

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी