30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयविधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचा राडा; कांदा-लसणाच्या माळा घालून केलं आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचा राडा; कांदा-लसणाच्या माळा घालून केलं आंदोलन

राज्यभरातील घाऊक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर चांगलेच गडगडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अलीकडेच ५०० किलो कांदा विकून एका शेतकऱ्याला सगळा खर्च वसून करुन व्यापाऱ्याने अवघे दोन रुपये हातावर ठेवले होते. असेच काही प्रकार राज्याच्या इतर भागांमध्ये घडले होते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला होता. या असंतोषाचे पडसाद मंगळवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या आमदारांनी कांदा आणि लसणाच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. (Vidhan Bhawan)

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरातील घाऊक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर प्रचंड घसरल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी शेकडो किलो कांदा विकून शेतकऱ्यांच्या हातात छदामही पडत नाही. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनाच उलट व्यापाऱ्यांना पैसे देण्याची वेळ ओढावल्याचे निदर्शनास आले होते.

कांद्याची निर्यात बंद करण्यात आल्याने बाजारपेठेत कांद्याची आवक प्रचंड वाढली आहे. त्यामुळे कांद्याच्या भावांना उठाव मिळताना दिसत नाही. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात रान उठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय पावले उचलणार किंवा कांदा उत्पादकांसाठी एखादी महत्त्वाची घोषणा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान सरकारच्या निष्क्रियतेबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्याचेच पडसाद काल विधानभवनातही उमटल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या आमदारांनी कांदा आणि लसणाच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख यांच्यासह विरोधी पक्षाचे सर्व आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून सरकार विरोधात घोषणा देत होते. ‘द्राक्षाला भाव मिळालाच पाहिजे’, ‘सोयाबीनला भाव मिळालाच पाहिजे’, ‘कांद्याला भाव मिळालाच पाहिजे’, ‘शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘सरकार सरकार जोमात जोमात, शेतकरी बांधव कोमात कोमात’, अशा घोषणांनी विरोधकांनी विधिमंडळाचा परिसर दणाणून सोडला.

हे सुद्धा वाचा :

संतापजनक: १० पोती कांद्याच्या बदल्यात शेतकऱ्याला फक्त २ रुपयांचा चेक!

कर्जमाफी योजना असूनही महाराष्ट्रात २०२२ मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

VEDIO : सरकार जोमात, शेतकरी कोमात ; विरोधकांची सरकारविरोधात विधानभवनात घोषणाबाजी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी