30 C
Mumbai
Thursday, May 18, 2023
घरराजकीयअजितदादा, निवडणूक आयोग नाही, MPSC बोललो बरं का - मुख्यमंत्री

अजितदादा, निवडणूक आयोग नाही, MPSC बोललो बरं का – मुख्यमंत्री

एमपीएससी विद्यार्थ्यांनी पुण्यात गेल्या आठवड्यात केलेले आंदोलन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: रात्री रस्त्यावर उतरून या विद्यार्थ्यांची समजून काढल्यानंतर मागे घेतले होते. त्याबाबत मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री निवडणूक आयोगावरच घसरले होते. लोकसेवा आयोग असा उल्लेख करण्याऐवजी त्यांनी निवडणूक आयोग असा उल्लेख केला होता. त्यावेळी व्हायरल व्हिडीओवरुन मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात राष्ट्रवादी आघाडीवर होती. MPSCवरील चर्चेत मुख्यमंत्री उत्तर देत असताना त्याचीच विधानसभेत सर्वांना आठवण झाली.

MPSC प्रश्नावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणहून जाणीवपूर्वक विधानसभेत निवडणूक आयोगाचा उल्लेख केला. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना त्यांनी आपण निवडणूक आयोग नव्हे तर राज्य लोकसेवा आयोग म्हणाल्याचे लक्षात आणून दिले. अर्थात, तत्पूर्वी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची जीभ निवडणूक आयोगाकडे घसरता-घसरता राहिली. (CM Eknath Shinde To Ajit Pawar)

MPSC विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावरून त्यांची बरीच टिंगल-टवाळी करण्यात आली होती. सोशल मीडियावरूनही त्यांना ट्रोल केले गेले होते. याबाबतचे मीम्ससुध्दा व्हायरल झाले होते. त्या पार्श्वभूमीवर, MPSC प्रश्नावरील चर्चेत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवडणूक आयोगाचा मुद्दामहून उल्लेख केला. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे पाहून मुख्यमंत्री म्हणाले, “निवडणूक आयोग दादा बोललो नाही हं मी आज. निवडणूक आयोग नाही बोललो, एमपीएससी बोललो. आयोग आयोग आहे. निकालाला महत्त्व आहे.”

 

अर्थात, तत्पूर्वी पुन्हा एकदा मुख्यमंत्री बोलता-बोलता राहिले. एमपीएससीऐवजी निवडणूक आयोगच त्यांच्या तोंडी आले होते. मात्र, लक्षात आल्याने “निवड” एवढ्यावर थांबून त्यांनी योग्य ती दुरुस्ती केली. मुख्यमंत्री म्हणाले, एमपीएससीबाबत विद्यार्थ्यांची भूमिका होती, ती शासनाने भूमिका आणि ती भूमिका निवड ….” इथे मुख्यमंत्री “निवड”वरच थांबले आणि “आपल्या एमपीएससी आयोगाने देखील (ती भूमिका) मान्य केली,” असे योग्य वाक्य त्यांनी दुरुस्तीसह “निवडणूक आयोग” न म्हणता पूर्ण केले. हे वाक्य पूर्ण केल्यानंतर मग त्यांनी अजित पवारांना आपण यावेळी योग्य बोलल्याचे लक्षात आणून दिले.

पुण्यात गेल्या आठवड्यात एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: रात्री रस्त्यावर उतरून या विद्यार्थ्यांची समजून काढून एका बैठकीत हा आंदोलनाच विषय निकाली काढत मार्गी लावला होता. त्याबाबत मीडियाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया विचारली होती. मात्र, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री निवडणूक आयोगावरच घसरले होते. लोकसेवा आयोग असा उल्लेख करण्याऐवजी त्यांनी निवडणूक आयोग असा उल्लेख केला होता. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नावर आपण निवडणूक आयोगाशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले होते. शिंदेच्या या अजब वक्तव्याचा व्हिडिओ त्यांना नेमकी काय म्हणायचे आहे, अशा प्रतिक्रियांसाह सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विविध राजकीय पक्षांनी त्यावरून टीकाही केली होती.

 

मुख्यमंत्री मीडियाशी बोलताना म्हणाले होते, “मी स्वतः एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत बोललो. विद्यार्थ्यांनी जी भूमिका घेतली, तिच सरकारची देखील भूमिका आहे. डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह या दोन परीक्षा पद्धतीबाबत अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. जी नवी पद्धत 2025 पासून सुरु करण्यात येणार होती, त्याबाबत निवडणूक आयोगाला आम्ही पत्र देऊन कळवले आहे. निवडणूक आयोगाकडूनही सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. सरकार एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भूमिकेशी सहमत आहे. निवडणूक आयोगाने याच प्रकारे निर्णय घ्यावा, हेच सरकारला अपेक्षित आहे.” या ‘स्लिप ऑफ टंग’वरुण झालेल्या टिंगल-टवाळी आणि सोशल बदनामीनंतर एकनाथ शिंदेंनी माफी मागितली होती. “दिवसभर निवडणूक आयोग, कोर्टकचेरीच्या बातम्या सुरू असल्याने चुकून, अनावधानाने MPSC ऐवजी निवडणूक आयोग असा शब्द तोंडून निघाला,” असे स्पष्टीकरणही त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते.

 

त्यावेळी व्हायरल व्हिडीओवरुन मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात राष्ट्रवादी आघाडीवर होती.  “यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले…”, असे ट्वीट राष्ट्रवादीने केले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची चांगलीच खिल्ली उडविली होती. त्यामुळेच विधानसभेतील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरील चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी आपण लोकसेवा आयोग्यच म्हटल्याचे सांगून अजित पवार यांना कोपरखळी मारली.

हे सुद्ध वाचा :

शिंदे-फडणवीस सरकारने ST कर्मचाऱ्यांना सोडले वाऱ्यावर; कोर्टाच्या आदेशानुसार पगार वेळेत, मात्र 780 कोटींची PF, ग्रॅच्युईटी थकविल्याचे विधानसभेत केले मान्य!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सर्व फुटीर आमदार अपात्र ठरणार?

VEDIO : तुमच्या कोंबडी हुलला आम्ही भीक घालत नाही ; भास्कर जाधव यांचा एकनाथ शिंदे गटाला टोला

CM Eknath Shinde To Ajit Pawar, Lokseva Commission Not Election Commission, अजितदादा निवडणूक आयोग नाही MPSC बोललो बरं का मुख्यमंत्री, Eknath Shinde To Ajit Pawar Bring To Mind, Vidhansabha

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी