33 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरराजकीय'समस्या सोडवता येत नसतील तर सत्तेतून बाहेर पडा'; वडेट्टीवारांचा भुजबळांवर रोष

‘समस्या सोडवता येत नसतील तर सत्तेतून बाहेर पडा’; वडेट्टीवारांचा भुजबळांवर रोष

राज्यात मराठा आरक्षणामुळे वातावरण चांगले तापले आहे. यामुळे गावा-गावात शहरात वाद होऊ लागले आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन, मोर्चे काढले जात आहेत. सभा घेतल्या जात आहेत. मात्र आरक्षणाचा मुद्दा बाजूला राहत असून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण होत आहे. एकीकडे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) सभा घेत आहेत, तर दुसरीकडे ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सभा घेत आहेत. छगन भुजबळांनी सभेत जरांगे पाटलांबाबत काही वक्तव्य केले होते. यानंतर जरांगेंनी भुजबळांवर पलटवार करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामधून जातिवाद निर्माण होऊ लागला असल्याचे कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचे (Vijay Wadettivar) म्हणणं आहे.

आरक्षणावरून राज्याचे वातावरण हे जातिवादाने दूषित होत असून आता नेते मंडळींंनी या मराठा आरक्षण अणि ओबीसी आरक्षणामध्ये उडी घेतली आहे. रात्री घरात बसलेल्या जरांगेंना राजू टोपे आणि रोहित पवारांनी पुन्हा उपोषणास आणून बसवले असल्याचा दावा भुजबळांनी केला होता. तर जरांगे तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नसल्याची टीका भुजबळांनी केली. वैयक्तिक टीकेवर जरांगेंनी संतापून भुजबळांबाबत आदर होता मात्र आता आदर राहिला नसल्याचे जरांगे म्हणाले आहेत. यामुळे हा मुद्दा अधिकच विकोपाल गेला आहे. यावर आता विजय वडेट्टीवीरांनी सध्याच्या सुरू असलेल्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.

हे ही वाचा

घड्याळ कुणाचं? शरद पवार सुनावणीसाठी दिल्लीला रवाना होणार

आधी मध्य प्रदेश आणि आता तेलंगणा; निवडणुकीच्या तोंडावर राम मंदीराची ऑफर सुरूच

‘भुजबळ मंत्री असून कॅबिनेटमध्ये ऐकलं जात नाही’

काय म्हणाले वडेट्टीवार

ओबीसी समाजाच्या हक्काचे आरक्षण राहावे आणि मराठा आरक्षण हे वैयक्तित स्वरूपात देण्यात यावे अशी मागणी वडेट्टीवारांनी केली. मात्र यामुळे वाद-विवाद होत असून दोन्ही समाजात तेढ निर्माण होणार असेल तर हे मान्य नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले आहेत. सरकारमध्ये राहून जर हे प्रश्न सोडवता येत नसतील तर सरकारमधून बाहेर पडा,असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.

समाजाची बाजू मांडताना कोणीही टोकाची भूमिका मांडू नये. शाहू फुले आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र आहे, मी आणि माझा पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी सभेत ज्या पद्धतीने टोकाचे विधान केले त्याला माझे समर्थन नाही. सरकारकडून अनेकांना प्रमाणपत्र देऊन झाले आहेत. सत्तेत असून ओबीसी समाजाच्या समस्या सोडवता येत नसतील तर त्यांनी सत्ता सोडली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी