32 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयविलासरावांचे सुपुत्र अमित देशमुख भाजपच्या वाटेवर? लातूरच्या राजकारणातील सस्पेंस वाढला!

विलासरावांचे सुपुत्र अमित देशमुख भाजपच्या वाटेवर? लातूरच्या राजकारणातील सस्पेंस वाढला!

काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र (Vilasrao Deshmukh’s son) माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) सध्या भाजपच्या  (BJP) वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहेत. त्यामुळे लातूरमध्ये सध्या राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाला आमदार संभाजी निलंगेकरांनी कडाडून विरोध केला असला तरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका विधानामुळे सध्या राजकारणातील सस्पेंस वाढला आहे. बावनकुळे यांनी नुकतेच पक्ष प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील असे विधान केले होते. त्यामुळे येत्या काळात भाजपच्या गळाला कोणते नेते लागणार याची चर्चा जोरात सुरू आहे. (Vilasrao Deshmukh’s son Amit Deshmukh on the way to BJP?)

विलासराव देशमुख हे काँग्रेसचे मात्तब्बर नेते होते, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यातील काँग्रेस पक्षावर आपली मजबूत पकड देखील ठेवली होती. तसेच इतर पक्षातील नेत्यांशी देखील त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या कार्यकाळात लातूर जिल्ह्यात काँग्रेसपक्ष हा बालेकिल्ला होता. आज देखील लातूर जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे. मात्र सध्या अमित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहेत.

भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात बोलताना याबाबत वाच्यता करत अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाला देखील विरोध केला आहे. आपला सत्तेचा पायंडा आणि राजकीय वारसा शाबुत ठेवण्यासाठी अमित देशमुख हे भाजपमध्ये येण्याच्या प्रयत्नात असल्याचे निलंगेकर यावेळी बोलताना म्हणाले. अमित देशमुख भाजपमध्ये येण्यास उत्सुक असले तरी आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही. अमित देशमुख हे लातूरचे राजकुमार आहेत. त्यांनी जनतेचे प्रश्न कधीच मांडले नाहीत. त्यांमुळे त्यांची भाजपमध्ये येण्याची कितीही इच्छा असली तरी त्यांचा पक्षप्रवेश माझ्या कार्यकर्त्यांना आवडणार नाही, असे देखील आमदार निलंगेकर यावेळी बोलताना म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री, मंत्र्यांचे ‘शेरे’ ठरणार कुचकामी, सरकारचा नवा आदेश !

जगातील कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात भारी आहे, माहितीये का?

कोकणच्या पर्यटनासाठी मंत्री रवींद्र चव्हाणांचा बूस्टर

काय म्हणाले बावनकुळे ?

येत्या काळात पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील, महाराष्ट्राला धक्का बसेल असे पक्षप्रवेश भाजपमध्ये होतील, यात बरीच मोठंमोठी नावे आहेत. आता केवळ वेळ आणि ठिकाण ठरायचे आहे, असे विधानभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक विधान केले आहे. त्यामुळे आता राज्यातील कोणकोणते मोठे नेते भाजपमध्ये जाणार यांचे देखील तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपमध्ये येण्यास काही नेते प्रयत्न करत असले तरी स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये मात्र विरोध असल्याचे दिसून येत आहे. आमदार निलंगेकर यांनी देखील तो स्पष्टपणे बोलून दाखविला आहे. त्यामुळे राजकारणात आता काय होणार याच्या चर्चा मात्र राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी