29 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयआताच जागे व्हा, अन्यथा २०२४ नंतर हुकूमशाहीचा नंगानाच सुरु होईल !

आताच जागे व्हा, अन्यथा २०२४ नंतर हुकूमशाहीचा नंगानाच सुरु होईल !

यंत्रणांना हाताशी धरून भाजपने शिवसेनेची जी वाताहत केली आहे, त्याने व्यथित होऊन उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्व विरोधी पक्षांना एकजूट करण्याचे आवाहन केले आहे. आज जी परीस्थिती भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केला आहे, भविष्यात अशी परिस्थिती भाजप कोणत्याही पक्षावर आणू शकतो. आताच जर यांचा सामना केला नाही, तर २०२४ ची निवडणूक कदाचित अखेरची निवडणूक ठरेल. आणि त्यानंतर मात्र या देशात हुकूमशाहीचा नंगा नाच सुरु होईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे. सोमवारी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेना भवन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपच्या हेतूबद्दल साशंकता व्यक्त केली. (Wake up now, otherwise dictatorship will be imposed after 2024!)

Wake up now, otherwise dictatorship will be imposed after 2024!

उद्धव ठाकरे म्हणाले, “एकनाथ शिंदे गटाने शिवसेना आणि धनुष्य बाण चोरलं आहे. तो त्यांचा पूर्वनियोजित कट होता. पण त्यांना ठाकरे हे नाव चोरता येणार नाही. मी मॉं आणि बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलो, हे माझं भाग्य आहे. हे भाग्य त्यांना मिळू शकत नाही. दिल्लीवाले त्यांना हे भाग्य देऊ शकत नाही.” निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्य बाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केल्यानंतर सर्वच स्तरांतून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. निवडणूक आयोगाने शेण खाल्ले अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली. निवडणूक अयोग बरखास्त करण्याची मागणी आता उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (dismissed Election Commission) निवडणूक अयोग आत्ताच बरखास्त केला पाहिजे. निवडणूक प्रक्रियेनेच निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजे अशी आमची मागणी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

…अन्यथा निवडणूक आयोगाविरोधात खटला दाखल करू
उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पक्ष निधीबाबत बोलण्याचा अधिकार नसल्याचे म्हंटले आहे. ते म्हणाले, “निवडणूक आयोगाला फक्त नाव आणि चिन्हाबाबत निर्णय देण्याचा अधिकार आहे. पक्षनिधीचा दावा ठरविण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. अन्यथा निवडणूक आयोगाविरोधात खटला दाखल केला जाईल. देशात निवडणूक प्रक्रिया राबविणे, पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवणं हा त्यांचा अधिकार आहे.”

हे सुद्धा वाचा 

२००० कोटींनी न्याय विकत घेतला ; देवेंद्र फडणवीसही व्यवहारात सामील

आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच, प्रकाश आंबडेकर यांची ग्वाही

तिथे हजर असतो तर संजय राऊतांना मारले असते ; संदीप देशपांडे संतापले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी