30 C
Mumbai
Tuesday, May 23, 2023
घरराजकीयVEDIO : तुमच्या कोंबडी हुलला आम्ही भीक घालत नाही ; भास्कर जाधव...

VEDIO : तुमच्या कोंबडी हुलला आम्ही भीक घालत नाही ; भास्कर जाधव यांचा एकनाथ शिंदे गटाला टोला

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदारांना व्हीप बजावला. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्य-बाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला बहाल केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने सर्वच्च न्यायालयात व्हीपच्या आधारावर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित राहण्याबाबत सर्व ५५ आमदारांना व्हीप बजावला आहे. मात्र, या व्हिपला आम्ही भीक घालत नसल्याचे भास्कर जाधव यांनी म्हंटले आहे. तुमच्या कोंबडी हुलला आम्ही भीक घालत नाही, अशी बोचरी टीका भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. (We are not afraid of your whip)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांना परिशिष्ट १० चा उल्लेख करण्याचा अधिकार तरी आहे का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. त्यावेळी भास्कर जाधव यांनी भाजपचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा संदर्भ देत भाजपच्या राजकारणावर टीका केली आहे. ते म्हणाले, “२०३३ साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय कारकिर्दीत पक्षांतर्गत बंदीविरोधी कायदा बनविण्यात आला. त्यामध्ये परिशिष्ट १० हे जाणीवपूर्वक नमूद करण्यात आले. दिवंगत अटलबिहारी वाजपेयी याना पक्षाचे दोन भाग मान्यच नव्हते. ज्या कोणाला पक्षातून बाहेर पडायचे असेल त्यांनी आपला नवीन पक्ष स्थापन करावा वा नवीन पक्षात सामील व्हावं. मूळ पक्ष हा त्यांचा पक्षाचं राहात नाही.”

अटलबिहारी वाजपेयी यांना पक्षांतर्गत फूट मान्यच नव्हती. आणि म्हणून त्यांनी सांगितले होते की,”मला जर एखादा पक्ष फोडून सत्तास्थापन करण्यास सांगितले, तर अशा पद्धतीने स्थापन झालेल्या सत्तेला मी स्पर्शदेखील करणार नाही. चिमट्यानेही मी स्पर्श करणार नाही.” भारतीय जनता पक्षात अटलबिहारी वाजपेयींसारखे तत्त्ववेत्ते, लोकशाहीवर विश्वास असणारे नेते होते. आज तीच भारतीय जनता पक्षाकडून आपल्या नेत्यांच्या तत्वांना तिलांजली देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना परिशिष्ट १० बद्दल बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर आघात केला आहे.

पाहा VEDIO :

हे सुद्धा वाचा

फेसबुक लाईव्ह सुरु असताना ३५ लाख खर्च झाले, त्याची माहिती घेतली का; शिंदेंचा अजित पवारांना टोला

सुभाषसिंग ठाकूर कोणाचा माणूस आहे याचे उत्तर द्या, महाराष्ट्रद्रोह्यांचे राष्ट्रद्रोह्यांना आव्हान

वरळीतून नाही, तर कोपरी-पाचपाखाडीतून निवडणूक लढवतो ; आदित्य ठाकरेंचे शिंदेंना आव्हान

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी