28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयआम्ही उद्धव ठाकरेंसोबतच, प्रकाश आंबडेकर यांची ग्वाही

आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच, प्रकाश आंबडेकर यांची ग्वाही

निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यातील घडामोडींना नाट्यमयरित्या वेग आला आहे. भाजपने उद्धव ठाकरे गटाला एकामागून एक असे धक्के द्यायला सुरुवात केली आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण चिन्ह उद्धव ठाकरे गटाकडून हिसकावून घेतल्यानंतर विधानभवनातील शिवसेना कार्यालयावरही एकनाथ शिंदे गटाने ताबा मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे यांच्याशी युती तोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अकोला येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘ओबीसी’ परिषदेदरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आंबेडकर यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. (We stand with Uddhav Thackeray)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली होती. सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचे टाळावे चाटले, असे अमित शाह म्हणाले होते. त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी अमित शहांचा ‘मोगॅम्बो’ असा उल्लेख केला. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले, “राजकारणात अशी टोपण नावे एकमेकांना बहाल केली जातातच. त्यामुळे राजकारणातील खेळकरपणा टिकून राहतो. राजकारण्यांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे. असे माझे वैयक्तिक मत आहे.” सध्या देशातील वैचारिक दहशतवाद सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यासंदर्भाने प्रकाश आंबेडकर यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. ते म्हणाले, राजकारण्यांनी हे सर्व खिलाडीवृत्तीने स्वीकारले पाहिजे. नाही तर याने मला मोगॅम्बो म्हटलं म्हणून त्याला गोळ्या घालायच्या असं व्हायला नको.

विधान भवनातील शिवसेना कार्यालय एकनाथ शिंदेंच्या ताब्यात

 

‘मोगॅम्बो’ अमित शाह 

कोल्हापूरमधील कार्यक्रमात बोलताना अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर उपरोधिक शब्दांत टीका केली होती. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ‘दुध का दुध पाणी का पाणी’ झालं. असे ते म्हणाले होते. अमित शाहांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनीदेखील तितक्याच आक्रमक शैलीत प्रत्युत्तर दिले होते. ते म्हणाले होते, “मोगॅम्बो काल म्हणाला की, मी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले. पण सध्या जे काही राज्यात सुरु आहे, त्यात कोण कोणाचे काय चाटतं आहे? तेच कळायला मार्ग नाही.”

 

हे सुद्धा वाचा

२००० कोटींनी न्याय विकत घेतला ; देवेंद्र फडणवीसही व्यवहारात सामील

तिथे हजर असतो तर संजय राऊतांना मारले असते ; संदीप देशपांडे संतापले

शिवरायांच्या प्रतिमेची तोडफोड, हार कचरापेटीत फेकला ; JNU मध्ये राडा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी