22 C
Mumbai
Saturday, December 10, 2022
घरराजकीयEknath Shinde : मंत्रीमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

Eknath Shinde : मंत्रीमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत. ते भामरागड येथे चेकपोस्टवर पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले असता, पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत. ते भामरागड येथे चेकपोस्टवर पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) त्यांचे आगमन झाले असता, पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात पूर्व विदर्भाला स्थान मिळेल का, असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला असता ते म्हणाले, केवळ पूर्व विदर्भच नव्हे तर सगळ्यांचाच विचार विस्तारात केला जाईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दिवाळीनंतर सरकार बर्खास्त करण्याच्या मागणीच्या विधानावर पत्रकारांनी त्यांना पश्न विचारला असता, पटोले यांची मागणी हास्यास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधीपक्षांचे टीका करण्याचे काम आहे, पण आम्ही टीकेने नव्हे तर कामाने उत्तर देऊ असे देखील मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या भेटीबाबतदेखील मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रीया दिली, ते म्हणाले, दिवाळीनिमित्त राज ठाकरे यांनी मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावले होते. राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात बहुमताचे भक्कम सरकार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत 397 जागांवर भारतीय जनता पक्ष, तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने 243 ग्रामपंचायतींवीर सरपंच निवडून आणले. त्यानंतर आताही इतर सरपंच येऊन भेटत असून हा आकडा वाढतो आहे. त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे.

हे सुद्धा वाचा:
WhatsApp : भावा वैताग आलेला नुस्ता…! व्हाट्स अ‍ॅप गंडलं होतं…..

High Court News : अपघातात अपंगत्व आलेल्या व्यक्तींसाठी मुंबई उच्च न्यायालयाने घेतला महत्वाचा निर्णय

diwali wishes: समीर वानखेडे, क्रांती रेडकर यांच्या घरी रामदास आठवलेंची खास भेट; वाचा काय म्हणाल्या क्रांती रेडकर

-सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असून नुकसान भरपाईसाठी हेक्टरची मर्यादा वाढवली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली.
तसेच समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनाबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे आले असून येत्या नोव्हेंबर महिन्यात हा महामार्ग सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
– गडचिरोलीमध्ये नक्षलवाद कमी होत आहे
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी गडचिरोलीचा पालकमंत्री असताना दरवर्षी येथील पोलिसांसोबत दिवाळी साजरी करत होतो. आता मुख्यमंत्री असताना देखील पोलिसांसोबत यंदाची दिवाळी साजरी करणार आहे. पोलिसांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेण्यासाठी मी भामरागडला जात आहे. पोलिसांचे मनोबल वाढल्यामुळेच आज गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!