34 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयबंडखोर आमदारांचा खर्च कोण करतेय, अनिल गोटेंनी केली ईडीकडे तक्रार !

बंडखोर आमदारांचा खर्च कोण करतेय, अनिल गोटेंनी केली ईडीकडे तक्रार !

टीम लय भारी

मुंबई : राज्यात गेल्या ५ दिवसांपासून ‘सत्ता’नाट्य सुरु आहे. या सत्ता नाट्याकरिता करोडो रुपयांची उधळण करण्यात येत आहे. याआधी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदारांना चोख बंदोबस्तात ठेवण्यात आले होते. त्यावेळी सुद्धा आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. या सर्व गोष्टींसाठी होणार अमाफ खर्च कोणाकडून करण्यात येत आहे? यासाठीचे नेमके कोण स्पॉन्सर आहेत, याबाबत विचारणा करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र माजी आमदार अनिल गोटे यांनी एन्फोर्समेंट डायरेक्ट अर्थात ईडीला पाठवले आहे.

माजी आमदार अनिल गोटे यांनी ईडीला पाठवलेल्या पत्रात गेल्या महिन्याभरापासून आमदारांवर खर्च झालेल्या पैशांबाबत तपास करण्यात यावा, याबाबत लिहिले आहे. १ जून ते २० जून पर्यंत आमदारांना मुंबईतील ताज हॉटेल, ट्रायडेंट हॉटेल, वेस्टर्न हॉटेल अशा पंच तारांकित, सप्त तारांकित हॉटेलमध्ये आमदारांना राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी ठेवण्यात आले होते. या हॉटेलमधील एका दिवसाचे भाडे लाखो रुपये आहे. असे असंख्य रूम या निवडणुकीच्या काळात वापरण्यात आले होते.

आता तर, काही आमदारांना एका रात्रीत सुरत वरून थेट गुवाहाटी येथे खाजगी विमानांनी हलविण्यात आले. याकरिता वापरण्यात आलेली खाजगी विमाने, सुरत आणि गुवाहाटीमधील हॉटेल्स याकरिता नेमके कोण खर्च करत आहेत. गेल्या महिन्याभरात अरबस्थानातील धनदांडग्यांना लाजवेल, अशा सोयीसुविधांचा वापर या आमदारांकडून करण्यात येत आहे.

निवडणुकीमध्ये जर कोणी प्रलोभन दिले, पैसे वाटप केले तर त्यावेळी थेट निवडणूक रद्द करण्याचे अधिकार आहेत. इतकेच नव्हे तर, जर एखाद्या सावकाराकडे पैसे सापडले तर त्याला थेट तुरुंगवास होतो. मग आता सर्व प्रसार माध्यमातून या खर्चा संबंधीच्या बातम्या प्रसारित होत आहेत. त्यामुळे निवडणुकांमध्ये सामान्य जनतेसाठी वेगळे नियम आणि विधानपरिषद, राज्यसभा या निवडणुकांमध्ये आमदार-खासदार यांच्यासाठी वेगळे नियम आहे का? असा प्रश्न यामधून अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.

अनिल गोटे यांनी ईडीला पाठवलेल्या या तक्रार पत्रात आमदारांना ५० कोटी मिळाल्याची माहिती देखील दिली आहे. याबाबतचे कॉल रेकॉर्ड त्यांनी ईडीला पाठवले आहेत. ईडीकडून गेल्या काही दिवसात अनेक आमदार-खासदारांवर धाडी टाकण्यात येत आहात. त्यामुळे माजी आमदार अनिल गोटे यांनी ईडीला या सर्व प्रकाराबाबत चौकशी करावी, आणि आपले काम पुन्हा चोख पार पडावे, असे देखील या पत्रात लिहिले आहे.

दरम्याम, अनिल गोटे यांनी ईडीला दिलेल्या या पत्रानंतर ईडीकडून खरंच कारवाई करण्यात येणार आहे का? सध्या गुवाहाटीमध्ये राहून आराम करणाऱ्या आमदारांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार का? की, ईडी फक्त केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या आदेशाचे पालन करून आपली कारवाई करते, हे दाखवून देणार.

हे सुद्धा वाचा :

‘एनसीपी’सोबत काम करतांना आमची घुसमट होते !

आमदार उद्धव ठाकरेंची भेट घेतात, अन् तिथून गुवाहाटीला जातात हे आश्चर्यकारक : अनिल गोटे

शिवसेनेचा मोठा निर्णय; बंडखोरांना बाळासाहेबांचे नाव वापरता येणार नाही, त्यांनी बापाचे नावाने मते मागावीत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी