27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरराजकीयमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात फडणवीसांचे आव्हान

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात फडणवीसांचे आव्हान

राज्यात काही दिवसांपासून राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू आहे. यापूर्वी अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे येत आहे. अजित पवारांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरबाजी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे अजित पवारांनी बंड केला आणि सत्ता स्थापन केली. यावेळी अजित पवारच मुख्यमंत्री होतील अशी आशा आता अजित पवार गटाला लागली होती. मात्र तसे झाले नाही, याउलट आता देवेंद्र फडणीसच मुख्यमंत्री हवे आहेत. अशा घोषणा आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या ठाणे बालेकील्ल्यातून येत आहेत. यामुळे आता राजकारणाला वेगळे रंग चढू लागला आहे.

आगामी निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण असतील याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीला सत्तेतून हटवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडले आहेत. मात्र आता या पक्षात मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याच्या प्रयत्नात शिंदे गट आहे. तर दुसर्या बाजूला आता अजित पवार गटाकडूनही येत्या काळात अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळवून देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. १७ ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस ठाण्यात लोकसभा-विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आले असता ठाणेकरांनी भविष्यातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हवेत अशा घोषणा दिल्या आहेत.

हेही वाचा

ड्रगमाफिया ललित पाटीलच्या डोक्यावर कुणाचा हात?

भारत-पाकिस्तान सामन्यात ‘जय श्री राम’चा नारा, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीकडे तक्रार

मुख्यमंत्री शिंदे समाजवादी संघटनांबद्दल काय म्हणाले?

तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवा?

गडकरी रंगायतन सभागृहात झालेल्या भाजपच्या निवडणुक आढावा बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणेकरांना आगामी मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारला. बावनकुळे म्हणाले की, २०२४ निवडणुकीत मुख्यमंत्री कोण हवा आहे. असा प्रश्न विचारला असता यावर सभागृहात लोकांनी देवेंद्र फडणवीस…देवेंद्र फडणवीस असा गजर करण्यात आला आहे. आम्हाला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हवे आहेत, बावनकुळेंच्या प्रश्नावर एकसाथ लोकं उत्तरले आहेत. या उत्तरावर बावनकुळेंनी लागा कामाला असे आदेश दिले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात नविन चर्चा होऊ लागल्या आहेत.

ठाणे शहरातील गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे बैठक घेत असताना ठाणे शहर, मिरा-भाईंदर, ओवळा-माजिवडा, कोपरा-पाचपाखडी या मतदारसंघातील एक हजार कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आ्णि लोकांचे प्रश्न जाणून घेतले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी