हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवडते उद्योगपती गौतम अदानी यांचा बाजार उठू लागलाय. दुसरीकडे, सर्वसामान्य जनतेचे एलआयसी आणि स्टेट बँकेतील पैसे अदानीसाठी वळते करण्यावरून देशात सरकार कुणाचे? मोदींचे की अदानीचे?? हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. (Whose Government In The Country Modi or Adani) त्यानिमित्ताने उद्योगपती बिर्ला-इंदिरा गांधी यांच्या किश्श्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.
ब्लिट्झ हे एकेकाळी गाजलेले इंग्रजी साप्ताहिक टॅब्लॉइड वृत्तपत्र होते. विशेषत: आफ्टरनूनसारखीच शोध पत्रकारितेसाठी ब्लिट्झची ख्याती होती. 2 सप्टेंबर 1967 रोजी ब्लिट्झने सवाल उपस्थित केला होता, की देशात सरकार कुणाचे आहे? बिर्ला की इंदिराजी?? तेव्हा संसद इंदिरा गांधींच्या नेतृत्वात होती. ब्लिट्झच्या सवालावर काँग्रेसचे संसदीय सचिव चंद्रशेखर म्हणाले होते – बिर्लांचे!

आज 56 वर्षांनंतर 56 इंचांच्या सरकारला कोणीतरी हाच प्रश्न विचारण्याची आहे, की देशात सरकार कुणाचे? मोदींचे की अदानीचे? तसे शेअर्सधारक अजूनही संभ्रमात आहेत. तरीही या प्रश्नाचे उत्तर आजच्या घडीला एकच असेल – सरकार अदानी-अंबानींचे. देशात 56 वर्षांपासून अनेक सरकारे आली-गेली; पण कालानुरूप चित्र काही बदलले नाही. देश आजही 56 वर्षांपूर्वीच्याच स्थितीत दिसतोय. एकूणच असे दिसते, की भारतीय जनतेला प्रगती नव्हे तर गुलामगिरीच आवडते. काँग्रेसनेही वेगळे काय केलेय? त्यांनीही आपल्या चुकांवर पडदाच टाकला आहे.

हे सुद्धा वाचा :
पंतप्रधानांचे लाडके उद्योगपती अदानीशेठचा बाजार उठतोय!
पळपुटया बागेश्वरच्या डोक्यावर परिणाम; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची निंदा नालस्ती
मीडिया तरी कुठे बदलला? कारण माध्यमांचे मालक, संपादक संगळ्यांनीच गुलामगिरी स्वीकारली होती अन आजही तीच स्थिती आहे. परिणामत: आज देश उद्ध्वस्त होत आहे. प्रत्येकाच्याच पापांची यादी मोठी आहे. किंमत चुकवावी लागतेय ती देशातील जनतेला, 56 वर्षांपूर्वीही आणि आजही ..!

(फोटो कंटेंट क्रेडिट : सौमित्र रॉय, भडास, सोशल मीडिया)