लय भारी चे संपादक तुषार खरात कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निढळ या गावी नुकताच दौरा केला(Whose wind in Koregaon constituency). निढळ गावात त्यांना एक शेतकरी भेटले. ते एक उच्चशिक्षित शेतकरी होते. ते उच्च शिक्षण घेऊन सुद्धा ते बेरोजगार आहेत.
शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर शरद पवारांसोबत बंद दाराआड चर्चा
नोकरी करायची इच्छा असून त्यांना नोकरी मिळत नाही नाईलाजाने त्यांना शेती करावी लागत आहे. सरकारकडून पण त्यांना काही सवलती भेटत नाहीत. कोरेगाव विधान मतदारसंघांमध्ये सध्या महेश शिंदे व शशिकांत शिंदे हे दोन आमदार आहेत. तर महेश शिंदे आणि गद्दारी केली आणि शशिकांत शिंदे एकनिष्ठ राहिले त्याबद्दल तेथील लोकांना एक अभिमान आहे. भाजप प्रणित एकनाथ शिंदे सरकार हे शेतकऱ्यांसाठी काहीच फायद्याचे नाही असे मत त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
शिवसेना आमदाराच्या डोक्यात दोन वर्षांच्या सत्तेने हवा आणि गर्व : शशिकांत शिंदे
शरद पवार हे एकनिष्ठ माणूस आहेत व शशिकांत शिंदे हे एकनिष्ठ आमदार आहेत. व त्यांनी हेही सांगितलं की माझी लाडकी बहीण योजना ही फक्त मतदानासाठी नियोजित केलेली आहे.आमच्या मतदारसंघांमध्ये शशिकांत शिंदेंनाच आमचं मत असेल असे त्यांनी व्यक्त केले.