30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयअंधभक्तांचे विश्वगुरू गप्प का ? संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना सवाल

अंधभक्तांचे विश्वगुरू गप्प का ? संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना सवाल

कश्मीरमधील अल्पसंख्यांक समुदायाचे संरक्षण करण्यास भाजप सपशेल अपयशी ठरला आहे. मात्र, अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर मुस्लिमांना लक्ष्य केले जाते आणि त्याचा फायदा भाजपला संपूर्ण देशात होतो, असा दावा मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. भाजप राजकीय स्वार्थासाठी कश्मिरी पंडितांचा बळी चढवत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. पण भाजपसोबत सत्तेत असताना मुफ्ती यांच्या देशप्रेमाला ओहोटी लागली होती का? पंजाबात पुन्हा खलिस्तानी खडखड उफाळून येत असे असतानाही अंधभक्तांचे विश्वगुरू गप्प का? असे जळजळीत सवाल उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘सामना’मधून विचारले आहेत. (Why is the Vishwaguru of blind devotees silent?)

काश्मीरमध्ये पंडितांचा खुलेआम संहार सुरु आहे. २६ फेब्रुवारीला पुलवामा जिल्ह्यात पत्नीसोबत बाजारात गेलेल्या संजय शर्मा या काश्मिरी पंडिताला त्याच्या पत्नीसमोर गोळया घालून ठार करण्यात आले. याविरोधात उठलेला काश्मिरी पंडितांचा आक्रोश दाबून टाकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेचे नाट्य दोन दिवस रंगवत ठेवले. मोदी शहांचे सरकार जबरदस्तीने आम्हाला कश्मीर खोऱ्यात पाठवीत आहेत, पण आमच्या जविताचे रक्षण करण्याची हमी घ्यायला ते तयार नाहीत. यांच्या राजकारणासाठी आम्ही किती वेळा रक्त सांडायचे? असा दाहक सवाल काश्मिरी महिला विचारात असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

Why is the Vishwaguru of blind devotees silent?

भाजपला मत द्यायची चूक पुन्हा करू नका
काश्मिरी पंडितांचे सध्या हत्यासत्रच सुरु आहे. या पार्श्वभूमीवर कश्मिरी पंडितांचे एक शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री असलेल्या जम्मूतील एका भाजप नेत्याला भेटायला गेले असता त्यांना त्या उर्मट नेत्याने अपमानास्पद वागणूक दिल्याचा किस्सा संजय राऊत यांनी सांगितलं आहे. या नेत्याला ते शिष्टमंडळ म्हणाले, साहेब, आम्ही पंडितांनी भरभरून मतदान केले आणि तुम्ही आमच्यासाठी काहीच करायला तयार नाही. आम्ही आमच्या पोराबाळांसह जम्मूच्या रस्त्यावर आहोत. तुम्हाला मते देऊन आम्ही चूक केली असे आम्हाला वाटते. त्यावर तो उर्मट मंत्री शिष्टमंडळाला म्हणाला,”तसे असले तर पुन्हा ती चूक करू नका.”

संजय राऊत म्हणतात..
पुलवामात संजय शर्मांची हत्या त्यांच्या पत्नीसमोर झाली. तेथे सकाळ हिंदू मोर्चा निघाला असता तर बरे झाले असते. पण तेथे शेपट्या घालायच्या व महाराष्ट्रात ‘हिंदू खतरे मे’ म्हणून छाती पिटायची. हे राजकारण समाज बिघडवत आहे.
पंजाबात पुन्हा एकदा खलिस्तानचा झेंडा फडकवावा हे धक्कादायक आहे. अमृतपाल सिंग हा खलिस्तानी चळवळीचे नेतृत्व करतोय व हिंसा घडवून आणतोय. त्याच्या चळवळीस पैसे कोठून येतोय याचा तपास करण्याची हिंमत मोदी-शहांच्या प्रिय ‘ईडी,सीबीआय व इन्कम टॅक्स’ने दाखवायला हवी.

हे सुद्धा वाचा

खरे तर भ्रष्ट वर्तणुकीसाठी या ४० आमदारांना आत टाकलं पाहिजे

संजय राऊतांना परिणाम भोगावे लागतील; अब्दुल सत्तारांचा इशारा

फडणवीस पुन्हा येणार; पण पुढच्या मार्गाने की मागच्या दाराने, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांना चिमटा

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी