33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीय'गोडसे'ला सुद्धा 'ब्लॉक' करणार का?

‘गोडसे’ला सुद्धा ‘ब्लॉक’ करणार का?

गुजरातमधील २०२२ च्या हिंदू-मुसलमान दंगलींचा रक्तरंजित पट उलगडून दाखविणारी "इंडिया : द मोदी क्वेश्चन" ही बीबीसी डॉक्युमेंटरी आयटी कायदा आणीबाणीतील अधिकार आणि तरतुदी वापरून केंद्र सरकारने ब्लॉक केली. सरकारच्या या मुस्कटदाबीविरोधात सर्वच स्तरांतून आक्षेप नोंदविण्यात आला. केंद्र सरकारच्या याच मनमानी कारभाराविरोधात 'एमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीदेखील आगपाखड केली आहे. महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याच्या आगामी चित्रपटावरसुद्धा केंद्र सरकार बंदी घालणार का? असा रोखठोक सवाल ओवेसी यांनी विचारला आहे.

युट्यूब, तसेच इतर व्हिडिओ शेअरिंग व टॉरंट प्लॅटफॉर्मवरुन “इंडिया : द मोदी क्वेश्चन” ही बीबीसी (British Broadcasting Corporation)डॉक्युमेंटरी ब्लॉक केल्यानंतर आता यासंदर्भातील ट्विट शेअरिंगही थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बेबंदशाहीविरोधात बुद्धिजीवी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर हैदराबादचे लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसींनीदेखील (Asaduddin Owaisi) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “मोदी सरकारने ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन” ही डॉक्युमेंटरी ट्विटर आणि यूट्यूबवरून काढून टाकली आहे. ब्रिटिशकालीन कायद्यांचा वापर करून यावर बंदी घालण्यात आली आहे. (Indian Goernment Blocked “India : The Modi Question” on Gujrat Riots Controversy erupted) आमचा मोदींना एक सवाल आहे, गुजरात दंगलींमधील लोकांची हत्या अंतराळातील किंवा आकाशातील कोणा अदृश्य शक्तीने केली का?”

null

गांधी हत्येबद्दल मोदींचे मत काय?
असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारच्या या जुलमी निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला आहे. नथुराम गोडसे ज्याने महात्मा गांधींची हत्या केली त्याच्याबद्दल तुमचे काय मत आहे? असा प्रश्न त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांना विचारला आहे. गोडसेवर लवकरच एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यावर मोदी बंदी घालणार का? माझे भाजपला आव्हान आहे की त्यांनी या चित्रपटावर बंदी आणावी, असे ओवेसी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

द मोदी क्वेश्चन : आयटी कायदा आणीबाणीतील अधिकार वापरुन केंद्राने बीबीसी डॉक्युमेंटरी केली ब्लॉक

PM Narendra Modi : पाकिस्तानातील राजकिय पेचप्रसंगासाठी पंतप्रधान मोदी जबाबदार! पीटीआयचा आरोप

भगवानही म्हणतात… राम सीतेसोबत बसून दारू प्यायचे!

सरकारचा हा निर्णय लज्जास्पद आहे
केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधी पक्षानेही आक्रमक भूमिका घेतली असून सरकारचा हा निर्णय लज्जास्पद असल्याचे म्हंटले आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी सरकारला याप्रकरणी धारेवर धरले आहे. त्या म्हणाल्या, ‘जगातली सर्वात मोठ्या लोकशाहीचे सम्राट आणि त्यांच्या दरबारी लोकांना एक डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाल्यावर इतके असुरक्षित वाटते. ही लज्जास्पद गोष्ट आहे.’ केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘तुकडे -तुकडे गॅंगकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.’ दरम्यान, ‘युनाइटेड किंग्डम’चे कादेतज्ज्ञ लॉर्ड कारण बिलिमोरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची “पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती” म्हणून स्तुती केली आहे.

२६ जानेवारीला “गांधी गोडसे : एक युद्ध”
राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केलेला “गांधी गोडसे : एक युद्ध” हा चित्रपट २६ जानेवारीला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनाआधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राजकुमार संतोषी यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, ही घटना १९४८ साली घडली त्याला आता जवळपास ७५ वर्षे होत आहेत. मला अजूनही असे वाटते की, आपल्याला त्यांचा (गोडसेचा) दृष्टिकोन जाणून घ्यायला भीती वाटते. तुम्ही याबाबत जर का नवीन पिढीला विचारले तर त्यांना ते सर्व जाणून घ्यायला आवडेल. पण याचा अर्थ मी नथुराम गोडसेंच्या कृत्याचे समर्थन करीत आहे असा बिलकुल होत नाही, असे संतोषी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी