28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
HomeराजकीयNCP Protest in Mantralay : अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांचा मंत्रालयावर मोर्चा

NCP Protest in Mantralay : अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांचा मंत्रालयावर मोर्चा

अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले होते. पण याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (ता. 15 नोव्हेंबर) मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय ते मंत्रालय असा मोर्चा काढण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण पूर्णतः ढवळून निघाले आहे. अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले होते. पण याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (ता. 15 नोव्हेंबर) मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय ते मंत्रालय असा मोर्चा काढण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तर यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. तर काँग्रेस आणि ठाकरे गट देखील अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आक्रमक झाला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना समज देऊन हे प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला होता.

अब्दुल सत्तार आणि शिंदे गटातील मंत्र्यांचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांकडून हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतर महिला पदाधिकाऱ्यांसहित काही महिन्यांपूर्वी मनसे पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या रुपाली ठोंबरे पाटील या देखील आपल्या महिलांसहित सहभागी झाल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महिलांचा मोर्चा हा राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयातून मंत्रालयाच्या दिशेने निघाला होता. परंतु त्याआधीच पोलिसांकडून हा मोर्चा अडवण्यात आला. ’50 खोके, माजले बोके’ अशा आशयाचे फलक या मोर्च्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून यावेळी झळकावण्यात आले. दरम्यान, हा मोर्चा मंत्रालय येथे पोहोचण्याआधीच पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना अडवून त्यांना अटक केली. यावेळी महिला आणि पोलीस यांच्यामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले.

हे सुद्धा वाचा

Abdul Sattar : कृषी मंत्री अब्दुल सत्तार बरळले; सुप्रिया सुळे यांना म्हणाले भिकार****

Abdul Sattar : अब्दुल सत्तार हे संस्कार नसलेले आदीमानव!; अनिल गोटे यांचा हल्लाबोल

Abdul Sattar : राज्य महिला आयोगाची एन्ट्री, अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करा!

या मोर्च्यामध्ये सहभागी झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईबद्दल मत व्यक्त केले. जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक काहीही न करता त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून देखील त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई का करण्यात आली नाही ? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या महिला आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, या आंदोलनाप्रकरणी राष्ट्रवादीच्या अनेक महिला कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी