33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीय'आता उरलेले उद्योग उत्तर प्रदेशच्या घशात घालण्यासाठी योगींना पायघड्या'

‘आता उरलेले उद्योग उत्तर प्रदेशच्या घशात घालण्यासाठी योगींना पायघड्या’

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) मंगळवार (दि. ४) आणि बुधवारी (दि.५ ) महाराष्ट्र दौऱ्यावर (Maharashtra visit)आहेत. आज सायंकाळी योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. दोन दिवसांच्या या दौऱ्यामध्ये योगी आदित्यनाथ उद्योगपती, बॉलीवूडचे निर्माते आणि दिग्दर्शकांची तसेच बॅँकांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा भेटून चर्चा करणार आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis government) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  (Nana Patole) यांनी जोरदार टीका केली आहे. आता उरलेले उद्योग उत्तर प्रदेशच्या घशात घालण्यासाठी खोके सरकारने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी पायघड्या घातल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचा हा कुटील हेतू जनतेने लक्षात घ्यावा, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावरुन नाना पटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे, ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून दिल्लीच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचे महत्व कमी केले जात आहे. वेदांता-फॉक्सकॉन हा १.५४ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पासह इतर महत्वाचे प्रकल्प गुजरातला भेट देऊन महाराष्ट्राचे मोठे आर्थिक नुकसान केले, लाखो तरुणांचे रोजगारही गेले.

हे सुद्धा वाचा

अखेर ईडीने किरीट सोमय्यांचा हट्ट पुरविला !

नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नरेंद्र मोदींचा मोठा कार्यक्रम!

मुंबई पोलीस दलात ‘विशेष पोलीस आयुक्त’ पदाची निर्मिती, पहिला मान देवेन भारती यांना!

उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढावी यासाठी ४ व ५ जानेवारीला योगी आदित्यनाथ हे मुंबईत येत असून उद्योगपती, चित्रपटसृष्टीतील महत्वाच्या लोकांशी ते चर्चा करणार आहेत. आता उरलेले उद्योग उत्तर प्रदेशच्या घशात घालण्यासाठी खोके सरकारने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी पायघड्या घातल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचा हा कुटील हेतू जनतेने लक्षात घ्यावा, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी