29 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरराजकीयबीडमधील तरूणाला नेपाळमध्ये लुटले, पण धनंजय मुंडे मदतीला धावले !

बीडमधील तरूणाला नेपाळमध्ये लुटले, पण धनंजय मुंडे मदतीला धावले !

बीडमधील आठ मित्र नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेले असता त्यांना तेथील काही गुंडानी लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या तरुणांनी त्वरित राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधत आपलं गाऱ्हाणं मांडलं. त्यांनतर धनंजय मुंडे यांनी सूत्रे हलवली आणि संकटात सापडलेल्या या आठही तरुणांना मदत केली. या सर्व तरुणांनी मुंडे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. बीडमधील केज तालुक्यातील शिरूर घाट येथील दीपक सांगळे हा त्याच्या सात मित्रांसह नेपाळला फिरायला गेले होते. त्यांना तेथील काही गुंडांनी त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील सर्व पैसे काढून घेतल्यामुळे भारतात परतायचे कसे ही अडचण त्यांच्यासमोर निर्माण झाली होती. मात्र, धनंजय मुंडे या तरुणांच्या मदतीला धावून गेल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. (youth from Beed robbed in Nepal, Dhananjay Munde ran to help!)

दीपक सांगळे याच्यासह त्याचे सात मित्र नेपाळमध्ये फिरायला गेले असता त्यांची लूटमार झाल्याची घटना घडली आहे. त्यानांतर या तरुणांकडे पैसेच शिल्लक राहिले नसल्याने त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यानंतर सांगळे आणि त्याच्या मित्रांनी धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधला आणि आपल्यावर ओढवलेल्या संकटाची कहाणी त्यांना सांगितली. शिरूर घाट येथील दीपक जीवन सांगळे याच्यासह महेश हरकर, आकाश खामकर, किरण चव्हाण, अविष्कार मुळीक, अक्षय पारेकर, विश्वजीत घुले, व सुरज लोंढे हे आठ तरुण फिरायला नेपाळमध्ये गेले होते. दरम्यान, सोमवारी रात्री काठमांडू शहरातील तामिल परिसरात फिरत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील सर्व पैसे हिसकावून घेतले तसेच त्यांच्या खात्यातील पैसेही जबरदस्तीने काढून घेतले. या चोरट्यांनी त्यानंतर या तरुणांना मारहाणही केली.

या प्रसंगामुळे घाबरलेल्या या तरुणांनी नजीकचे पोलीस ठाणे गाठले. पण त्या ठिकाणी त्यांची निराशाच झाली. पोलिसांकडून त्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या या तरुणांनी धनंजय मुंडे यांना पोलीस ठाण्यातील वायफाय वापरून व्हॉट्सअॅप कॉल करत मदत मागितली. मुंडे यांनी या तरुणांचे गाऱ्हाणे ऐकत त्यांना धीर दिला. धनंजय मुंडे यांनी एक ट्वीट करत परराष्ट्र मंत्री, नेपाळमधील भारतीय दूतावास, नेपाळ पोलीस, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आदींना याबाबत माहिती दिली. बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनाही या घटनेबाबत माहिती देण्यात आली. त्यांना या तरूणांच्या सुटकेसाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर नेपाळमधील भारतीय दूतावास व गृह विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थेट संबंधित पोलीस ठाणे गाठून तरुणांशी संपर्क साधला. दरम्यान, दरम्यान, या तरुणांना लुटणाऱ्या दोन भामट्यांना नेपाळ पोलिसांनी अटक केली आहे.

 

मुंडे यांच्या कार्यतत्परतेमुळेच तरुण सुखरूप
धनंजय मुंडे यांचा मध्यंतरी अपघात झाला होता. त्यामुळे ते सध्या प्रकृतीत सुधारणा यावी म्हणून आराम करीत आहेत. मात्र असे असतानाही त्यांनी तत्परतेने संकट सापडलेल्या या तरुणांना मदत केली. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कार्यालयात संपर्क साधत तरुणांना मदत करण्याबाबत विनंती केली. सर्व तरुण सध्या सुखरूप असून भारतीय शासकीय यंत्रणेमार्फत त्यांची तामिल (काठमांडू) येथील अग्रवाल भवन या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन पोहोचल्या राष्ट्रपती भवनात; काय आहे त्यांचा पेहराव याबाबत उत्सुकता

धक्कादायक : पोलिस ठाण्याच्या आवारातच तरुणाने पेटवून घेतले

BMC: मुंबईत पाणीबाणी! ४ फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी