30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रपुन्हा तक्तपालट होईल का? या भितीनेच फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून रोखले ?

पुन्हा तक्तपालट होईल का? या भितीनेच फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून रोखले ?

टीम लय भारी

मुंबईः महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांचे बंड थंड झाले. शिवसेनेतील बंडखोर नेत्यांचे सरदार एकनाथ शिंदे यांनी अनपेक्षीतपणे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. असे असले तरी देखील तक्तपालटाची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे.

सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर बंडखोर आमदारांना सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. परंतु 11 जुलैची सुनावणी अजून बाकी आहे. या भितीनेच कदाचित मुख्यमंत्री पदाची सूत्रे देवेंद्र फडवीसांना दिली नसावीत असा अनेकांना संशय वाटतो. शिवाय हे बंडखोर आमदार नेमके कोणत्या पक्षाचे हे देखील अजून स्पष्ट झालेले नाही. कारण शिवसेना पक्ष प्रमुख काहीही झाले तरी शिवसेनेला बंडखोरांच्या हातात देणार नाहीत. शिवसेनेची घटना कदाचित पक्ष प्रमुखांना यातून वाचवू शकेल.

एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांच्या सदस्यत्वा बाबत प्रश्न चिन्ह कायम आहे. या प्रकरणावर 11 जुलैला सुनावणी होणार आहे. सुनावणीच्या वेळी महाराष्ट्र पोलीस, विधान परिषद उपाध्यक्ष, केंद्र सरकार तसेच शिवसेनेकडून जबाब मागितला आहे. गुरुवारी एकनाथ शिंदेनी समर्थक आमदाराची नावे राज्यपालांना दिली होती. त्यानुसार राज्यपालांना सरकार बनविण्यास परवानगी दिली.

16 बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करणे तसेच विधानपरिषदेच्या उपाध्यक्षांवरील अविश्वास ठरावा संदर्भातील सुनावणी सुप्रिम कोर्टात बाकी आहे. जर कोर्टाने16आमदारांच्या विरोधात निर्णय दिला तर पुन्हा सत्तापालट होवू शकते. कदाचित पुन्हा सत्तापालट होवू शकते.या भितींने फडणवीसांना मुख्यमंत्री पद दिले नसण्याची शक्यता असल्याचा संशय तज्ञांना वाटतो.

हे सुध्दा वाचा:

 

तुमच्या ‘अश्रूंशी’ मी गद्दारी करणार नाही

बापरे ! 100 वर्षे जूनी चूल, 500 आचारी, 56 भोग, मातीच्या भांडयात बनते जेवण

आता ‘आरे‘ला ‘कारे‘ होणारच

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी