31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावाच लागेल : सुभाष देसाई

मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावाच लागेल : सुभाष देसाई

टीम लय भारी 

लातूर –  लातूरच्या उदगीर येथे ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्ष भरत सासणे, उद्घाटक शरद पवार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या उपस्थितीत ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज सुरुवात झाली. याप्रसंगी मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी पुन्हा एकदा मराठी अभिजात दर्जा द्यावा अशी मागणी केली. Subhash Desai Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan

अभिजात मराठीची मागणी आम्ही करत आहोत. दोन हजार वर्षांपूर्वीची मराठी भाषा आहे. सर्व निकष पूर्ण करूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही. हा दर्जा कधी मिळणार याची वाट पाहत आहोत.आमच्या माय मराठीला अभिजात मराठीचा दर्जा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आमची मोहीम अशीच पुढे चालू राहील. केंद्र सरकारला याबाबत निर्णय करावाच लागेल असं त्यांनी (Subhash Desai)  म्हटलं आहे.

या प्रसंगी त्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून पुस्तकांचे गाव ही संकल्पना सर्व जिल्ह्यामध्ये सुरू केली असं म्हटले आहे. आम्ही मराठी भाषेच्या सेवेसाठी संवर्धनासाठी विकासासाठी जाणिवपूर्वक कार्य करत आहे. नुकतेच आम्ही गुढीपाडव्याला मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन केले. त्या ठिकाणी नमुनेदार मराठी भाषा भवन उभे राहणार आहे.

आपण काही दिवसांपूर्वी सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी शिकवण्याचा कायदा केला आहे. मराठी हा एक विषय अनिवार्यपणे शिकवावा लागेल, असा कायदा केला . दुकानांवरील पाट्या मराठी भाषेतून लावण्याचे सक्ती केली. महापालिका, नगरपालिका यांच्यामध्ये मराठीचा वापर झाला पाहीजे असंही सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी म्हटले आहे. जनतेशी संवाद असो किंवा कार्यालयीन कामकाज हा मराठीतूनच झाला पाहीजे.

हे सुद्धा वाचा: 

उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी तरूणांना दिला मोलाचा सल्ला !

Grant Marathi Classical Language Status, Maharashtra Minister To Centre

अमोल मिटकरी ब्राह्मण समाजाविषयी नक्की काय बोलले होते, ते ऐका !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी