33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयनारायण राणेंच्या आव्हानाला सुभाष देसाईंचे प्रतिआवाहन

नारायण राणेंच्या आव्हानाला सुभाष देसाईंचे प्रतिआवाहन

टीम लय भारी

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलवण्याची गरज नाही असे विधान केले होते. मात्र उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होणार असे नाव न घेता घेता राणेंना प्रत्युतर दिले आहे (Subhash Desai’s appeal to Narayan Rane’s challenge).

दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबतच केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे देखील विमानतळाच्या उद्घाटन दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील अशी माहिती सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

उद्योग मंत्री सुभाष देसाई दुर्गम भागातील संकटग्रस्तांसाठी आले धावून

सुभाष देसाईंनी एमआयडीसीच्या माध्यमातून पुरग्रस्तांना केली मदत

देसाई यांनी सांगितले हा उपक्रम महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने हाती घेऊन आवश्यक बाबी पूर्ण करून झाले आहे. या प्रकल्पासाठी एकूण 286 हेक्टर जमीन वापरण्यात आली आहे. तसेच सुमारे 520 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव या प्रकल्पासाठी मागवण्यात आला आहे. त्यात आय आर बी, सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. यांना विमानतळ उभारणी, फायनान्स तसेच ऑपरेशन्स (DBFO) साठी भाडेतत्वावर (लीजवर) हे काम देण्यात आले आहे.

मराठी माणसांना अभिजात मराठीची माहिती असणं गरजेची : सुभाष देसाई

Set a deadline for the ongoing development works

विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी लागणा-या पाण्याचा पुरवठा, रस्ते विकास, संरक्षण भींत या सारखी कामे एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. यासाठी एमआयडीसीने 14 कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

या विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विमानतळामुळे कोकणाच्या विकासाला चालना मिळेल,  पर्यटन व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. कोकणाचे आकर्षण असलेल्या समुद्रापर्यंत आता विमान वाहतूक सुरू झाल्यामुळे अधिकाधिक पर्यटकांना पोहोचता येईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी