30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयसुपारी सभा घेत भोंगा कमळाला किती त्रास देतोय हे पुढील काळात समजेल...

सुपारी सभा घेत भोंगा कमळाला किती त्रास देतोय हे पुढील काळात समजेल : सुभाष देसाई यांचा मनसेसह भाजपला टोला

टीम लय भारी

संभाजीनगर : आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संभाजीनगर येथे सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अशा सुपारी सभा घेत भोंगा कमळाला किती त्रास देतोय हे पुढील काळात समजेल असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी मनसेसह भाजपला लगावला आहे. (Subhash Desai criticizes BJP along with MNS)

सुपारी सभा महाराष्ट्राने खूप पाहिल्यात

आजच्या महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची संभाजीनगर येथे सभा आहे. आता कोणी काही नवे नवे कार्यक्रम घेत आहेत ते कीती दिवस टिकतायत हेच पाहायचं. कारण आधी मराठी मराठी होतं आता हे भोंगा भोंगा आहे. एक माहित होतं की, भोंगा आणि कमळाचं नातं होतं आता. पण हा भोंगा कमळाला किती त्रास देतो हे पुढच्या काळात सर्वांना समजेल. अशा सुपारी सभा महाराष्ट्राने खूप पाहिल्यात त्यामुळे हा विषय आणखी किती दिवस टिकणार आहे तेसुद्धा पाहण्यासाठी जनतेप्रमाणे मीसुद्धा उत्सुक आहे, असे सुभाष देसाई म्हणाले.

 

…त्यामुळे संभाजीनगरमधील शांततले गालबोट लागणार नाही

संभाजीनगरचं वातावरण खूप चांगलं आहे. आता पर्यंत जिल्ह्यात जी काही संकट आली,अडचणी आल्या त्यामध्ये प्रशासनाने आणि पोलिसांनी या जिल्ह्यामध्ये आणि शहरात उत्तम कामगिरी बजावली आहे. आणि संकटातून जनतेला बाहेर येण्यास वेळोवेळी मदत केलेली आहे. त्यामुळे पोलीस त्यांचं कर्तव्यपार पाडत आहेत. म्हणून मला खात्री आहे संभाजीनगरच्या शांततेला कुठेही गालबोट लागणार नाही. कारण येथील जनता सुज्ञ आणि सहकारी आहेत, असे सुभाष देसाई म्हणाले.

कोणीही कीतीही चेथावणी दिली तरी जनता  डोकी भडकवून घेणार नाही

कोणीही कीतीही चेथावणी दिली तरी जनता आपली डोकी भडकवून घेणार नाही. इथली शांतता कायम राहिल माझी तशी विनंती आणि आवाहन या जनतेला आहे. आपण ज्याप्रमाणे सर्वांशी बंधुभावाचं नातं ठेवलेलं आहे तेच कायम जतन करायचं आहे. कोण काय करतं याकडे जनता अगदी चाणक्षपणे पाहत असते. त्यातून काय बोध घ्यायचा हे जनताच ठरवते हा आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराचे नाव औरंगाबाद असून संभाजीनगर अशी एक प्रकारची मुक्तता दिली आहे. सर्व संभाजीनगरवासिय ही ओळख जतन करत आहेत.त्यामुळे संभाजीनगरमधील शिवसेनेचं नातं अभेद्य असून, पुढे कायमच तसं राहिलं यामागे काहीही शंका नाही, असा विश्वास सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दाखवला.

बाळासाहेबांनी काढलेले त्यावेळचे उद्गार इतिहासप्रसिद्ध

बाळासाहेबांनी काढलेले त्यावेळचे उद्गार इतिहासप्रसिद्ध झालेले आहेत, की ही बाबरी मशिद पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे. ते डगमगले नाही. जे आज या गोष्टीला पांठिबा देताय ते त्यावेळी पळून गेले होते. बाबरीचं पतंग झालं याची जबाबदारी घ्यायला कोणाही तयार नव्हतं. मग त्यात भाजप ,विश्व हिंदू परिषद नाहीतर संघ असेल नाहीतर नेते असतील किंवा कार्यसेवक असतील. मात्र कार्यसेवकांवर जेव्हा जबाबदारी दिली तेव्हा त्यांनी हात झटकले. त्यावेळेस एकटे शिवसेनाप्रमुख त्यामागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी ठामपणे सांगितले बाबरी मशिद पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे. त्याच बाळासाहेबांचे आम्ही सर्व अनुयायी आहोत, शिष्य आहोत. भक्त आहोत. हीच भावना सबंध संभाजीनगरमध्ये असल्यामुळे इकडचे वातावरण अतिशय शिवसेनामय आहे आणि राहिल यावर आमचा विश्वास आहे, असे सुभाष देसाई (Subhash Desai) म्हणाले.


हे सुद्धा वाचा : 

औरंगाबाद जिल्ह्यात 500 कोटीचा निधी मंजूर, सुभाष देसाई यांनी दिली माहिती

भाषा विभागाचा तीन वर्षांचा कृती आराखडा तयार करा, सुभाष देसाई यांचे आदेश

उद्योग मंत्री सुभाष देसाई दुर्गम भागातील संकटग्रस्तांसाठी आले धावून

नारायण राणेंच्या आव्हानाला सुभाष देसाईंचे प्रतिआवाहन

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन !

Subhash Desai takes jibe at Gujarat govt

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी