29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रउद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीला उजाळा !

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीला उजाळा !

टीम लय भारी

मुंबई: उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash desai) यांच्या हस्ते ‘व्यंगचित्र जत्रा’ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. जागतिक व्यंगचित्र दिनाचे औचित्य साधून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आणि कार्टुनिस्ट कम्बाईनच्यावतीने भरविण्यात आलेल्या ‘व्यंगचित्र जत्रेला’ अनेकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या विषयावर आधारित हे प्रदर्शन असून महाराष्ट्राप्रमाणेच भारतातील व रशिया, चीन, युक्रेन, युरोप, इराक आदी देशांतील व्यंगचित्रकारांनी यात सहभाग नोंदविला आहे. Subhash desai on balasaheb thackeray

याप्रसंगी सुभाष देसाई (Subhash desai) यांनी यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीला उजाळा दिला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना व्यंगचित्रकार असल्याचा नेहमी अभिमान वाटे. त्यांनी व्यंगचित्र आणि व्यंगचित्रकारांवर कायम प्रेम केले. व्यंगचित्रकारांची घटत्या संख्येबाबत ते सतत चिंतीत होते. त्यात राजकीय व्यंगचित्रकार निर्माण होतं नसल्याची खंत ते व्यक्त करतं. आजही तिच परिस्थिती कायम आहे. दरम्यान, आम्ही मार्मिकचे स्वरुप बदलले असून राजकीय विषयावर चपखल भाष्य करणाऱ्या व्यंगचित्रकारांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक वेगाने पूर्ण होत असून या ठिकाणी व्यंगचित्रासाठी स्वतंत्र दालन असेल. त्या ठिकाणी माहिती, प्रदर्शन, कार्यशाळा भरविण्यात येईल. यावेळी कार्टुनिस्ट कंम्बाईनचे अध्य़क्ष संजय मेस्री यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि कार्टुन या विषयी सखोल माहिती दिली. तसेच व्यंगचित्र संस्था निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा : 

सुपारी सभा घेत भोंगा कमळाला किती त्रास देतोय हे पुढील काळात समजेल : सुभाष देसाई यांचा मनसेसह भाजपला टोला

Loudspeaker Row LIVE Updates: Raj Thackeray’s “Deadline” Ends, Mumbai On Alert

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी