29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरे यांनी दिलेल्या व्हीजनमुळे महाराष्ट्र प्रगतीकडे घोडदौड करत आहे : सुभाष...

आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या व्हीजनमुळे महाराष्ट्र प्रगतीकडे घोडदौड करत आहे : सुभाष देसाई

टीम लय भारी 

मुंबई : पुण्यात सुरू असलेल्या पर्यायी इंधन क्षेत्रातील उद्योजक व गुंतवणूकदारांच्या परिषदेसाठी आज उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य नेहमीच नवनवीन कल्पना राबविण्यासाठी पुढे असते. त्यामुळे महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात कायमच पुढे आहे. दोन वर्षांच्या कोविड कालावधीत उद्योग क्षेत्र थांबले नाही, असे प्रतिपादन सुभाष देसाई यांनी केले आहे. (Subhash Desai praised Aditya Thackeray)

महाराष्ट्र राज्य नेहमीच नवनवीन कल्पना राबविण्यासाठी पुढे असते. त्यामुळे महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात कायम पुढे आहे. दोन वर्षांच्या कोविड कालावधीत उद्योग क्षेत्र थांबले नाही. सर्वसामान्य नागरीक, मजूर यांचा प्रश्न निर्माण झाला. परंतु मुख्यमंत्र्यांनी ठोस धोरण आखून अर्थचक्र सुरू ठेवले. महाराष्ट्राची औद्योगिक जाण लक्षात घेऊन नवीन उद्योग आणले. दोन वर्षांत तीन लक्ष कोटींचे सामंजस्य करार आम्ही केले. त्यातून तीन लाख रोजगार निर्माण होणार आहेत. राज्यातील विविध भागांत गुंतवणुकीचे हे प्रस्ताव आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी यात विशेष लक्ष दिले. मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक विकासाला चालना दिली. महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही, असे सुभाष देसाई म्हणाले.

विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या परिषदेतून झाला. इव्ही क्षेत्रात विविध देशांतील गुंतवणुकदारांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. या माध्यमातून शाश्वत विकासांकडे आपल्या राज्याची वाटचाल सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या व्हीजनमुळे राज्य प्रगतीकडे घोडदौड करत आहे. इव्ही पॉलिसी आम्ही निश्चित केली. पर्यावरण, उर्जा आणि उद्योग विभागाने एकत्र येऊन हे धोरण ठरवले. विजेवर चालणारी वाहने निर्मितीसाठी अनेक देश महाराष्ट्रात दाखल होत आहेत. प्रत्येक नागरिकांना हे वाहन घेण्यासाठी शासन अनुदान देत आहे, असे सुभाष देसाई म्हणाले.

या निमित्ताने पर्यावरणाचे संवर्धन आणि आर्थिक सक्षमता वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होण्याचे स्वप्न पाहात आहेत. या माध्यमांतून हे उद्दीष्ट साध्य केले जाईल. बायो फ्यूअल आणि इव्ही क्षेत्र यासाठी मोठे योगदान देईल, असा विश्वास असल्याचे सुभाष देसाई सांगितले.


हे सुद्धा वाचा :

Maha signed MoUs worth Rs 3 lakh cr with 98 firms amid pandemic: Minister Subhash Desai

उद्योग विकासासाठी महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही : सुभाष देसाई

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी