34 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रभारतातील कारागिरांच्या परंपरागत डिजाईन आणि कलाकारीचा कोणालाही मुकाबला करता येणार : सुभाष...

भारतातील कारागिरांच्या परंपरागत डिजाईन आणि कलाकारीचा कोणालाही मुकाबला करता येणार : सुभाष देसाई

टीम लय भारी

मुंबई : गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन मैदानावर ‘ज्वेलरी मशिनरी ॲन्ड अलाईड इंटरनॅशनल एक्स्पो प्रॉडक्ट ॲन्ड एक्स्पो’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आज त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. जेम्स ॲन्ड ज्वेलरी व्यवसायिकांनी एकत्रित येऊन मशिनरीचे क्लस्टर तयार करायचे असेल तर उद्योग विभागार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. यासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन निर्देश दिले जातील, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दिली. हे प्रदर्शन 5 एप्रिल ते 8 एप्रिल या दरम्यान होत आहे. यात ज्वेलरी तयार करण्यासाठी आवश्यक असणारे मशिन्स तसेच इतर सोयींची माहिती इथे मिळणार आहे. (Subhash Desai says no one can compete with Indian art)

 

जेम्स ॲन्ड ज्वेलरीसाठी नवी मुंबईत शंभर एकर जागा दिली आहे. याठिकाणी सुमारे एक हजार उद्योग उभे राहतील या माध्यमातून दिड लाख रोजगार निर्माण होणार आहे. याशिवाय लाखो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. देशांतील सर्वात मोठा आणि सर्वात सुंदर पार्क तयार होणार आहे.जागतिक स्तरावर भारतातील कारागिरांनी जेम्स आणि ज्वेलरी क्षेत्रात उत्तम काम केले आहे. मूल्यवान रत्न विक्रीत भारत कायम अग्रस्थानी आहे. भारतातील कारागिरांच्या कौशल्याला जगभरातून मागणी आहे. ही कला या कारागिरांनी परंपरागत व्यवसायातून जीवंत ठेवली आहे. या क्षेत्रात आपली परंपरागत डिजाईन आणि कलाकारी आहे याचा कोणालाही मुकाबला करता येणार नाही, असे उद्गारकला ही कारागिरंच्या हातात असते.

मशिन्स हे कारागिरांना मदत करण्यासाठी उपयोगी पडावे, त्यांना कार्यवृद्धीत सहयोगी व्हावे त्यांच्या कारागिरीला पर्याय निर्माण करण्यासाठी मशिन्सचे आक्रमन व्हायल नको. मेहनत कमी व्हावी मात्र त्यांची कला जिवंत रहावी अशी अपेक्षा उद्योगमंत्री  देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.


हे सुद्धा वाचा :

आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या व्हीजनमुळे महाराष्ट्र प्रगतीकडे घोडदौड करत आहे : सुभाष देसाई

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी