30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयउद्योग मंत्री सुभाष देसाई दुर्गम भागातील संकटग्रस्तांसाठी आले धावून

उद्योग मंत्री सुभाष देसाई दुर्गम भागातील संकटग्रस्तांसाठी आले धावून

टीम लय भारी

मुंबई : उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी नैसर्गिक आपत्ती , महामारी अशा संकटांच्या काळात दुर्गम भागात तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य सेवांचे बळकटीकरण करावे असा उपदेश कॉर्पोरेट कंपन्यांना दिला आहे.( Subhash Desai has advised corporates to strengthen health services with the help of technology in remote areas during times of crisis.)

दहिसर येथील मुंबई महानगरपालिकेच्या जम्बो कोविड केअर केंद्रामध्ये हनिवेल कंपनीच्यावतीने सुविधायुक्त अतिदशता विभागाची स्थापना करण्यात आली होती. सुभाष देसाई यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

हे देखील वाचा :

‘मुंबईचे लोकलप्रवाशी शिवपंख लावणार, अन् कामावर उडत उडत जाणार’, मनसेने सांगितले भाकीत

शरद पवार दिल्लीत अमित शाहांची भेट घेणार

चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादी नेत्याने पोलिसांत केली तक्रार

शिवसैनिकांनी मुंबई विमानतळावरील अदानीचे नामफलक फोडले; संजय राऊतांकडून समर्थन

कोविड काळात आरोग्य विभागाला हनिवेल कंपनीने मोलाचे सहकार्य केले होते. त्यामुळेच दहिसर येथील जम्बो कोविड केंद्रामध्ये हनिवेल कंपनीने अतिदशता केंद्र सुरू केले आहे. केंद्रात व्हेंटिलेटरस , फ्लॉवर बेड्स , बी आय पॅप , मशिन्स, मॉनिटर्स , एक्स रे मशिन्स , इसिजी मशिन्स इत्यादी गोष्टी या अतिदशता केंद्रामध्ये असणार आहेत.

तसेच या पुढील नैसर्गिक आपत्ती व महामारीच्या संकट काळात कॉर्पोरेट कंपन्यांनानी मदत करण्याची गरज असल्याचे देसाई म्हणाले. देसाई यांच्यासोबत हनिवेल कंपनीनेचे प्रमुख आशिष गायकवाड , महपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी हे देखील उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी