29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रदंगली पेटवणारे हे उच्चवर्णीय ब्राम्हण असतात आणि रस्त्यावर उतरणारी बहुजन मुलं

दंगली पेटवणारे हे उच्चवर्णीय ब्राम्हण असतात आणि रस्त्यावर उतरणारी बहुजन मुलं

टीम लय भारी 

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी राज ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. सुजात यांनी म्हटलं बाबरी मस्जिदची दंगल असो, भीमा कोरेगावची दंगल असो. आपण हेच बघितले की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात. या दंगलीत रस्त्यावर उतरतात ती बहुजन मुलं असतात”.Sujat Ambedkar big statement

“माझं राज ठाकरेंना एवढंच म्हणणं होतं की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहुजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवा. जर तुम्ही स्वत:च्या मुलाला उतरवणार नसाल तर मग दुसऱ्यांच्याही उतरवू नका,” असं सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचे विधान केले होते. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलेले आहे. यातचं सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला १०० टक्के पाठिंबा आहे, फक्त आधी त्यांनी अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावावा असं जाहीर आव्हान दिलं होतं.

हे सुध्दा वाचा: 

राज ठाकरे यंदा फुल्ल फॉर्म मध्ये, यंदा बाकीच्यांना हाणायचं म्हणजे हाणायचं; सोबत राज ठाकरेंकडून पुन्हा मराठी कार्ड!

“…. तुम्हारा क्या काम,” भोंग्यावरुन सुजातला मनसेचा सवाल

Vishwas Nagre Patil यांच्यावरही अमित साटम यांनी साधला निशाणा | BJP

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी