महाराष्ट्र

पुणे ग्रामीण पोलिसांनी रोखले तब्बल ११ बालविवाह सुप्रियाताईंनी केले कौतुक !

बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिसांचे आभार मानले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या भरोसा सेलच्या माध्यमातून या वर्षात सुमारे ११ बालविवाह रोखण्यात आले आहे. तसेच सहा प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे अशी माहिती सुळें दिली आहे.

Anil Anna Gote Advt

पुणे ग्रामीण पोलिसांनी रोखले तब्बल ११ बालविवाह सुप्रियाताईंनी केले कौतुक !

 

टीम लय भारी 

पुणे : बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुणे पोलिसांचे आभार मानले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या भरोसा सेलच्या माध्यमातून या वर्षात सुमारे ११ बालविवाह रोखण्यात आले आहे. तसेच सहा प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे अशी माहिती सुळें दिली आहे. Supriya Sule appreciation Pune Rural Police

सुप्रिया सुळें (Supriya Sule) पुणे पोलिसांच्या या कामाचे कौतुक केले आहे. त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या मतदारसंघातील घटलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टींची दखल घेतात. त्यांनी केलेल्या या कौतुकामुळे पुणे पोलिसांचे मनोबल वाढते.

नेमक काय आहे भरोसा सेल?

भरोसा सेल’ हे पीडित महिला व मुले यांच्या तक्रारी स्विकारण्यासाठी चोवीस तासही सुरु असते. तीन पाळ्यांमध्ये या सेलचा कारभार सुरु असतो. रात्री बेरात्री कुणी महिला आल्यास तिच्या राहण्याची व्यवस्था देखील करण्यात येते. तसेच 1091 100 या महिला हेल्पलाईन क्रमांकावर तक्रारदारांच्या तक्रारी स्विकारुन त्या संबधित तज्ज्ञांकडे तात्काळ पाठविण्यात येतात.  भरोसा सेल अंतर्गत कौटुंबिक हिंसाचार कायद्यातंर्गत संरक्षण तसेच विधी विषयक सेवा, वैद्यकीय सेवा, चाईल्ड हेल्पलाईन, महिला हेल्पलाईन महिला हेल्पलाईन, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशन, पिडीत महिलांचे पुनर्वसन या सेवांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा: 

आरक्षणासह ओबीसी समाजाच्या सर्व समस्या सोडवा, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

“Waah, Where Did You Learn?”: PM Amazed By Japanese Boy’s Hindi Greeting

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close