32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयआँकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है तब धान लगता...

आँकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है तब धान लगता है : सुप्रिया सुळे

टीम लय भारी

पुणे : पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात महागाईविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) सहभागी झाल्या. त्यांनी  केंद्र सरकरावर जोरादर टीका केली. सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांच्या भाषणाच्या ओळी म्हणतं केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले आहे.

आज मला सुषमा ताईंचं भाषण आठवत आहे. २०१३ मध्ये जेव्हा महागाई वाढली होती. भाजप विरोधात होती, आँकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है तब धान लगता है, असं स्वराज म्हणाल्या होत्या. मला हाच प्रश्न आज पुन्हा या सरकारला विचारायचा आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारला सुबुद्धी येऊ दे, नको त्या विषयांना महत्व देऊन केंद्र सरकार झोपायचं सोंग घेत आहे. त्याला जागं करण्याचं काम आम्ही करत असल्याचं सुळे  (Supriya Sule) यांनी सांगितलं आहे.

देशभरातील महागाई सध्या दिवसेंदिवस वाढतंच चालली असून यामुळे सर्वसामान्यांना फटका बसताना दिसत आहे. पेट्रोल डीझेलसहीत बाकींच्या वस्तूंनाही महागाईच्या झळा बसताना आपल्याला पहायला मिळत आहेत. वाढत्या महागाईच्या विरोधात आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

हे सुद्धा वाचा: 

राजकीय द्वेषापोटी फोन टॅपिंग; खरा सुत्रधार कोण हे उघड व्हावे : नाना पटोले

Hanuman Chalisa row: No need to display religious sentiments in public, says NCP chief Sharad Pawar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी