महाराष्ट्रमुंबईराजकीय

नाटक, नाटक असतं, तीन तास जायचं, आनंद घ्यायचा आणि घरी जायचं : खासदार सुप्रिया सुळे

औरंगाबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेत असतानाच भाजपनेही मुंबईत बुस्टर डोस सभेचे आयोजन केले आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य करत दोन्ही पक्षांवर जोरदार टीका केली आहे. “नाटक, नाटक असतं, तीन तास जायचं, आनंद घ्यायचा आणि घरी जायचं, ती वास्तविकता थोडीच असते ते नाटक असतं.” असा टोला भाजपच्या सभेवर सुप्रिया सुळे यांनी लगावला.

टीम लय भारी

नाटक, नाटक असतं, तीन तास जायचं, आनंद घ्यायचा आणि घरी जायचं : खासदार सुप्रिया सुळे

मुंबई:  औरंगाबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेत असतानाच भाजपनेही मुंबईत बुस्टर डोस सभेचे आयोजन केले आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य करत दोन्ही पक्षांवर जोरदार टीका केली आहे. “नाटक, नाटक असतं, तीन तास जायचं, आनंद घ्यायचा आणि घरी जायचं, ती वास्तविकता थोडीच असते ते नाटक असतं.” असा टोला भाजपच्या सभेवर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लगावला. Supriya Sule on raj thackeray and bjp

सेच राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांवरून अल्टीमेटम दिला आहे. त्यावर देखील सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली असून अल्टीमेटम शब्द माझ्या संस्कृतीत बसत नाही. यशवंतराव चव्हाण यांनी हा शब्द कधीच वापरला नव्हता. त्यामुळे या शब्दाचा अर्थ मला फारसा माहिती नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

याप्रसंगी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामाचं कौतुक केलं आहे. त्या म्हणतात की, राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांचं सरकार अतिशय चांगलं काम करत आहे. मी असं म्हणतं नाहीतर केंद्रातील आकडेवारी हे सांगतेय.

आमच्याकडे सक्षम गृहमंत्री देखील आहेत. राज्यात आणि देशात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मी खासदार म्हणून लक्ष घालायला पाहिजे. दिल्लीत घडणाऱ्या घटनांमुळे मला खूप वेदना होतात. त्यामुळे महाराष्ट्रात अशा काही गोष्टी घडत असेल तर त्याकडे माझे लक्ष असेल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा: 

सुटीला दुबईला न जाता वेरूळ अजिंठाला जा आणि कपडे सोलापूरचे घाला : सुप्रिया सुळे

‘Supriya Sule Was Asking…’: Shashi Tharoor Reveals Lok Sabha Chat With NCP MP After Meme Fest

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close