31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचाऱ्यांचा काल आनंद तर आज सिल्व्हर ओकवर आक्रोश

एसटी कर्मचाऱ्यांचा काल आनंद तर आज सिल्व्हर ओकवर आक्रोश

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी घरात शिरकाव केला. आज शुक्रवारी तिथे जमलेल्या कर्मचाऱ्यांनी शरद पवार (sharad pawar) यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. Supriya Sule Reached Silver Oak

या सगळ्या गोंधळात खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) सिल्व्हर ओकवर दाखल झाल्या. त्यांनाही एसटी कर्मचाऱ्यांनी घेरलं. आंदोलन करण्यारा कर्मचाऱ्यांना त्यांनी शांत बसण्याची विनंती केली. आपण शांतपणे बोलू असं ही त्या म्हणाल्या होत्या. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शांत राहण्याचे हात जोडून आवाहन केलं आहे.

एसटी महामंडळाचे पूर्णपणे विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आज आक्रमक झाला त्यांनी थेट सिल्वर ओकचा घेराव घातला. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना भडकवण्याचे काम कोण करतंय असा प्रश्न अता निर्माण होऊ लागला आहे.

सुळे यांनी म्हटलं की, माझे आईवडील, माझी मुलगी घरात आहेत. पहिली त्यांची सुरक्षितता मला बघू द्या. मी पुन्हा एकदा सांगतेय की मी ह्या क्षणी त्यांच्यासोबत संवाद करण्यासाठी तयार आहे. Supriya Sule Reached Silver Oak

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत असं म्हटलं की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे.

हे सुध्दा वाचा: 

शरद पवारांची मोदींवर खोचक टीका, अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येत आहेत

Protests Outside Sharad Pawar’s House, Daughter Supriya Sule Surrounded

मंगुर मासा खाण्यावर भारत सरकारने आणली बंदी | Magur fish

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी