मुंबई

आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, बाभळीकडे ढुंकूनही पहात नाहीत : सुप्रिया सुळेंची खोचक टिका

“आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात; बाभळीच्या झाडाकडे लोक ढुंकूनही पहात नाहीत”, असे सूचक विधान करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत खा. सुप्रियाताई सुळे यांनी अत्यंत सूचक टोला लगावला.

टीम लय भारीओ

ठाणे : “आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात; बाभळीच्या झाडाकडे लोक ढुंकूनही पहात नाहीत”, असे सूचक विधान करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत खा. सुप्रियाताई सुळे (Supriyatai Sule) यांनी अत्यंत सूचक टोला लगावला.(Supriyatai Sule criticizes on BJP)

आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, बाभळीकडे ढुंकूनही पहात नाहीत : सुप्रिया सुळेंची खोचक टिका

सुप्रियाताई सुळे (Supriyatai Sule) पुढे म्हणाल्या की, माझे सर्व आयुष्य हे यशवंतराव चव्हाण यांना आदर्श मानूनच जगत आलेली आहे. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी दिवस, वार याची गरज मला भासत नाही. यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राचा मंगल कलश त्यांनीच आणला. किंबहुना, त्यांच्यामुळेच महाराष्ट्राकडे प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हणून पाहिले जात आहे. नवीन तंत्रज्ञान आणि नवे विचार हे महाराष्ट्रातच येतात अन् त्यानंतर ते देशभर पोहचते. आज देशामध्ये स्टार्टअपची जी चर्चा सुरु आहे. त्याकडे पाहता, केंद्र सरकारचाच अहवाल सांगत आहे की, देशातील सर्वात जास्त स्टार्टअप कुठे असतील तर ते केवळ आपल्या महाराष्ट्रातच आहेत.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्त खा. सुप्रियाताई सुळे (Supriyatai Sule) या ठाण्यात आल्या होत्या. या प्रसंगी त्यांनी बाळकूम येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी त्यांच्या सोबत गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, मा. खा. आनंद परांजपे, मा. महापौर मनोहर साळवी, मा. विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, मिलींद पाटील, प्रमिला केणी, राष्ट्रवादीच्या शहर महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक, नगरसेविका, राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

हे सुध्दा वाचा :- 

Inflation not restricted to Maharashtra alone, says Supriya Sule says during her visit to Thane

भारतीयांना परवडणारे तंत्रज्ञान विकसित करुन मारुती-सुझुकीचा ई- वाहनांची निर्मिती करण्याकडे कल

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close