31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeक्रिकेटICC T20 World Cup 2022 : Ind vs Pak सामन्याची तारीख जाहीर,...

ICC T20 World Cup 2022 : Ind vs Pak सामन्याची तारीख जाहीर, T20 वर्ल्ड कपचे संपूर्ण वेळापत्रक

टीम लय भारी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात २०२२ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपचे शेड्युल्ड जाहीर झाले आहे. ऑस्ट्रेलियाकडेच सध्याच्या टी २० चे चॅम्पिअन पद आहे. अशातच पुढील महामुकाबला हा ऑस्ट्रेलियातच होणार आहे. या टी २० वर्ल्ड कपमध्येही भारत आणि पाकिस्तानमध्ये महामुकाबला होणार आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC) ने आज सकाळी टी २० वर्ल्ड कपचे शेड्युल्ड जाहीर केले आहे. यंदा टी २० वर्ल्ड कपला १६ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे(T20 World Cup schedule, Ind vs Pak match date announced).

टी २० वर्ल्ड कपमध्ये सुपर १२ राऊंडला सुरूवात ही २२ ऑक्टोबरपासून होणार आहे. सुपर १२ मध्ये पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड असेल. तर टीम इंडिया ही आपली कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी २३ ऑक्टोबरला भिडणार.

टी २० वर्ल्डकप भारताचे सामने

– भारत वि पाकिस्तान २३ ऑक्टोबर (मेलबर्न)
– भारत वि ए रनर अप, २७ ऑक्टोबर (सिडनी)
– भारत वि दक्षिण आफ्रिका, ३० ऑक्टोबर (पर्थ)
– भारत वि ग्रुप बी विजेता, ६ नोव्हेंबर (मेलबर्न)

टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये टीम इंडियाचा सामना हा पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि दोन क्वालिफायर टीमसोबत ग्रुप २ मध्ये होणार आहे. याआधी टी २० वर्ल्डकप २०२१ मध्ये भारताचा सामना हा पाकिस्तानशी झाला. पण टीम इंडियाला या सामन्यात पाकिस्तान विरूद्ध या सामन्यात पराभव स्विकारावा लागला. टी २० तसेच ५० ओव्हरच्या टूर्नामेंटमध्ये पहिल्यांदाच भारताला पाकिस्तानशी पराभव स्विकारावा लागला.

हे सुद्धा वाचा

टी-20 संघाचा नवा कॅप्टन रोहित शर्मा, तर कसोटीतही रोहित व्हाईस कॅप्टन

ICC T20 World Cup 2022: India will look to seek revenge against Pakistan at MCG on October 23

ग्रुप – १  इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान
ग्रुप – २  भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश

टी २० वर्ल्ड कपचे संपूर्ण वेळापत्रक

टी २० वर्ल्ड कपरची सुरूवात ही १६ ऑक्टोबरला होईल, तर या टी २० वर्ल्ड कपचा शेवटचा सामना हा १३ नोव्हेंबरला रविवारी होईल. एकुण १६ संघ या टूर्नामेंटमध्ये सहभागी होतील. तर ऑस्ट्रेलियातील सात शहरांमध्ये या वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वातील संघाला सुपर १२ फेरीमध्येच टी २० टुर्नामेंटमधून बाहेर पडावे लागले होते. न्यूझीलंड आणि पाकिस्तानसोबतचा सामना गमावल्यानंतर भारत या सामन्यात कमबॅक करू शकला नाही. पहिल्यांद अशा वर्ल्ड कपच्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेविरोधात पराभवाचा सामना करावा लागला होता.

पण आता मात्र विराट कोहलीने टी २० आणि वनडे फॉरमॅटचा कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया ही टूर्नामेंट खेळणार आहे. त्यामुळे २०२१ मध्ये राहिलेला हिशोब पूर्ण करण्याची संधी रोहित शर्माकडे या वर्ल्ड कपच्या निमित्ताने असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी