सिनेमा

‘आता कोणत्या दगडाला शेंदूर फासणार?’ तमाशा लाईव्ह चित्रपटाचा टिझर लॅाच

संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटाचा टिझर नुकताच लॅाच करण्यात आला आहे. त्याच बरोबर या चित्रपटातील एक गाणे देखील प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचा टिझर आणि गाणे अक्षय तृतीयच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांचा भेटीस आला आहे.

टीम लय भारी

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live Movie) या चित्रपटाचा टिझर नुकताच लॅाच करण्यात आला आहे. त्याच बरोबर या चित्रपटातील एक गाणे देखील प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचा टिझर आणि गाणे अक्षय तृतीयच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांचा भेटीस आला आहे. प्रदर्शित झालेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी बोल लिहलं असून, पंकजा पडघन यांनी संगीत दिले आहे.(Tamasha Live Movie Teaser Latch)

‘आता कोणत्या दगडाला शेंदूर फासणार?’ तमाशा लाईव्ह चित्रपटाचा टिझर लॅाच

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

या चित्रपटात महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणेजेच सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, हेमांगी कवी, मृणाल देशपाडे अशा अनेक मराठी कलाकारांनी विविध भुमिका साकारल्या आहेत. ‘आता कोणत्या दगडाला शेंदूर फासणार ? हा या चित्रपटातील महत्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाच उत्तर २४ जूनला उलघडणार आहे. यात पाश्चिमात्य नृत्यासोबतच महाराष्ट्राची लोककलाही झळकत असून नृत्याला दिलेले हे आधुनिक रूप ही या (Tamasha Live Movie) चित्रपटाची खासियत आहे.

‘तमाशा लाईव्ह’बद्दल (Tamasha Live Movie) दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, ‘तमाशा लाईव्ह’च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात अतिशय कसलेले कलाकार, तगडी संगीत टीम आहे. हा एक संगीतमय चित्रपट असला तरी त्याला आधुनिकतेची जोड लाभली आहे.” या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता ताणली गेल्याचं पाहायला मिळत आहे.

हे सुध्दा वाचा :- 

Pushkar Jog wraps up dubbing for Sanjay Jadhav ‘Tamasha Live’

मंत्री धनंजय मुंडे यांनी अपघातग्रस्त तरुणाचे वाचवले प्राण !

 

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close