29 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeटेक्नॉलॉजीInternet :ऑक्टोबरमध्ये '5 जी' इंटरनेट सेवा सुरु होऊ शकते

Internet :ऑक्टोबरमध्ये ‘5 जी’ इंटरनेट सेवा सुरु होऊ शकते

लवकरच 5 जी सुपरफास्ट इंटरनेट सेवा सुरु होणार आहेत. केंद्रीय सूचना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये 5 जी सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

देशामध्ये 5 जी स्पेक्ट्रमची प्रक्रीया पुर्ण झाली आहे. लवकरच 5 जी सुपरफास्ट इंटरनेट सेवा सुरु होणार आहेत. केंद्रीय सूचना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये 5 जी सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. 5 जी सेवा लवकर सुरू व्हावी याची सर्वजण अतूरतेने वाट पाहत आहेत. 5 जी सेवा देणारी प्रमुख कंपनी एयरटेल बरोबरच जिओने देखील याची तयारी केली आहे. या दोन्ही कंपन्या स्पेक्ट्रममध्ये सामाविष्ट आहेत. यामध्ये वोडाफोन, आयडिया आणि आदानी ग्रुपचा देखील वाटा आहे.

ज्यांच्याकडे 4 जी चे सीम आहेत ते 5 जी वर काम करतील की, नाही. तसेच 5 जी सेवा आल्यावर 4 जीचा स्पीड कमी होईला का? अशा अनेक शंका ग्राहकांच्या मनात आहेत. एयरटेलच्या 5 जी नेटवर्कचा स्पीड खूप असणार आहे. मागच्या वर्षी नोकीयासोबत भागीदारीमध्ये 700 मेगाहर्ट्ज बँन्डमध्ये भारताच्या 5 जीचे परिक्षण करण्यात आले होते. ज्यामध्ये 1 जीबीपीएस इंटरनेट स्पीड आणि 10 म‍िलीसेकंद विलंबता दर होता.

त्यानंतर एअरटेलने हैद्राबादमध्ये देखील 5 जी इंटरनेट स्पीडचे परिक्षण केले. त्यामध्ये 3500 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रममध्ये 3 जीबीपीएसचा इंटरनेट स्पीड आहे. याचा स्पीड रिलायंस जिओ पेक्षा जास्त आहे. 5 एअरटेलच्या 5 जी नेटवर्कला सुरुवात झाली की, वापरकर्त्यांना काही सेकंदात 4 चित्रपट डाऊनलोड करता येणार आहेत. तर जिओने देखील अनेक शहरांमध्ये 5 जीचा स्पीड तपासला आहे.

हे सुद्धा वाचा

Leopard : बिबट्याला घाबरुन 18 दिवसांपासून 22 शाळांना सरकारने लावले कुलूप

‘Eknath Khadse : प्रश्नोत्तरांच्या तासाला ‘एकनाथ खडसे’ यांनी सत्ताधाऱ्यांना चांगले ‘खडसावले’

Ashtavinayak Darshan : दुसरा गणपती – भक्तांची चिंताहरण करणारा थेऊरचा ‘चिंतामणी’

 मुंबईमध्ये 4 ठिकाणी 5 जी स्पीड तपासणी करण्यात आली आहे. पूर्वी पेक्षा 8 पटीने हा स्पीड वाढला आहे. 5 जी साठी जिओने सर्वांत जास्त म्हणजे 24,740 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम खरेदी केली आहेत. जिओने त्यासाठी 22 सरकल्स तयार केले आहेत. जिओने मजबूत आणि लांब रेंज देणारे 700 मेगाहर्ट्ज 5 जी बँडसह फास्ट इंटरनेट देणारे 26 गीगाहर्ट्ज हाय फ्रीक्वेंसी बँन्ड खरेदी केले आहेत. त्यामुळे जीओचा स्पीड हा खूप चांगला असण्याची शक्यता आहे.

त्यांचा 13 शहरांमध्ये प्लॅन लॉन्च झाला आहे. आपला फोन 5 जीसाठी उपयुक्त आहे का? याचा शोध घ्यावा लागणार आहे. आपल्या स्पेसिफिकेशन पेजची तपासणी केली तर त्या ठिकाणी 5 जी बँडला आपला फोन सपोर्ट करेल का हे समजू शकेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी