34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeटेक्नॉलॉजीचुकूनही गुगलवर 'हे' सर्च करू नका, अन्यथा जावे लागू शकते तुरुंगात

चुकूनही गुगलवर ‘हे’ सर्च करू नका, अन्यथा जावे लागू शकते तुरुंगात

हल्ली गुगलवर एखाद्या छोट्यातील छोट्या गोष्टीबाबत माहिती अगदी सहज उपलबध होऊन जाते. त्यामुळे अनेकदा आपल्याला माहिती नसलेली एखादी माहिती देखील पूर्णतः गुगलवर सर्च केल्याने उपलब्ध होऊन जाते. पण अशाही काही गोष्टींची माहिती आहे जी गुगलवर सर्च केल्याने आपल्याला थेट तुरुंगात जावे लागू शकते.

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत, असे म्हंटले जायचे. परंतु आता याचसोबत मोबाईल आणि इंटरनेट या दोन गोष्टी देखील मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये समाविष्ट झाल्या आहेत. कारण क्वचितच काही लोक असतील जी मोबाईल आणि इंटरनेट शिवाय राहू शकत असतील. हल्ली लोकांकडे मोबाईल असणे हे पुरेसे नसते तर त्या मोबाईलमध्ये नेट अर्थात इंटरनेट असणे हे सर्वाधिक महत्वाचे असते. इंटरनेटमुळे माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आपल्याला हवी असलेली माहिती अगदी काही सेकंदात मिळवतो. परंतु बहुतेकवेळा लोक नको असलेली माहिती देखील उत्साहाच्या भरात सर्च करतात आणि संकटात सापडतात.

जर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे गुगलवर सर्च करण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही गोष्टींबद्दल माहिती देणार ​​आहोत, जे तुम्ही गुगलवर सर्च केले तर तुम्हाला तुरुंगात देखील जावे लागू शकते. एवढेच नाही तर तुम्हाला मोठा दंडही भरावा लागू शकतो. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच पाच विषयांची माहिती देणार ​​आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. त्यामुळे आम्ही सांगत असलेल्या ‘या’ पाच गोष्टींबाबत गुगलवर कधीची चुकून देखील सर्च करून माहिती मिळवू नका.

पायरेटेड चित्रपट :
जर तुम्ही नवीन चित्रपट पायरेट अर्थात ते कॉपी करण्याचे काम करत असाल आणि तुम्ही गुगलवर त्याच्याशी संबंधित काहीही शोधले तर तुम्हाला 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. एवढेच नाही तर तुम्हाला यासाठी 10 लाख रुपयांचा दंड देखील भरावा लागू शकतो.

गर्भपात :
अनेकदा गर्भपात कसे करता येते ?, यासाठी कोणती रुग्णालाये आहेत ? गर्भपात गर्भधारणा झाल्यावर कोणत्या महिन्यात करता येऊ शकते आणि असे असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी सर्च केले जाते. पण गर्भपातावर गुगल सर्च केल्यास तुरुंगात जाण्याची देखील वेळ येऊ शकते. ही बाब पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया:
हल्लीची तरुणाई गुगलवर नेमकं काय सर्च करेल ? हे सांगणे अवघड आहे. काही लोक तर उत्सुकता म्हणून बॉम्ब कसा तयार करण्यात येतो असे सर्च करून त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु गुगलवर बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया चुकून किंवा चेष्टेमध्ये जरी सर्च केलेली आहे, असे जाणवले तर तुम्ही पकडले जाऊ शकता. हा विषय सर्च करण्यासाठी अंडी याबाबतची माहिती मिळवण्यासंदर्भात तुरुंगात देखील जावे लागू शकते.

हे सुद्धा वाचा

जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने ठेवला होता ठपका, चौकशी समितीनेही दाखवल्या होत्या त्रुटी

भारताच्या करदात्यांसाठी आनंदाची बातमी ; आता 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करातून सूट मिळण्याची शक्यता

दररोज नारळाचे पाणी पिल्याने दूर होतात अनेक आजार; वाचा सविस्तर

चाईल्ड पोर्नोग्राफी :
हा अतिशय संवेदनशील विषय आहे आणि तो गुगलवर शोधणे हे अत्यंत धोकादायक देखील आहे. गुगलवर चाईल्ड पॉर्न अथवा चाईल्ड पोर्नोग्राफी सर्च केल्यास पोस्को कायदा 2012 च्या कलम 14 अंतर्गत तुरुंगात जावे लागू शकते. यासाठी पाच ते सात वर्षासाठी तुरुंगात राहावे लागू शकते.

पीडितेचे नाव :
अनेकदा काही प्रकरणे अशी असतात ज्यामध्ये पिडीतेचे नाव देण्यात येत नाही. परंतु काही लोक अशी देखील असतात जे पिडीतेचे नाव किंवा फोटो सर्च करतात आणि ती माहिती ऑनलाईन पोस्ट करतात. परंतु असे केल्यास आणि हि गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आल्यास त्या व्यक्तीस तुरुंगाची वारी देखील करावी लागू शकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी