32 C
Mumbai
Thursday, December 8, 2022
घरटेक्नॉलॉजीWhatsApp : भावा वैताग आलेला नुस्ता...! व्हाट्स अ‍ॅप गंडलं होतं.....

WhatsApp : भावा वैताग आलेला नुस्ता…! व्हाट्स अ‍ॅप गंडलं होतं…..

व्हाट्सअॅप आता अनेकांचे संवाद साधण्याचे प्रमुख माध्यम झाले आहे. जगभरात कोट्यवधी लोक व्हाट्सअॅपच मेसेंजर अॅपचा वापर करतात.. मात्र आज दुपारी व्ह़ॉट्स अँपची सेवा विस्कळीत झाल्याने अनेकांना मनस्ताप झाला होता.

भावा कुठं हाईस, जेवलायसं का?, चल येतोय का चौकात… अर्ऱर्ऱ.. मेसेजच जाईनां झालायं… काय झालयं… वैताग आलायं नुस्ता…. व्हाट्सअॅप गंडलंय… अशी जवळपास दोन तास व्हाट्स अॅप वापरकर्त्यांची दैना झाली होती. ना कोणाला मेसेज जात होता, ना मेसेज येत होता. मात्र दोन तासांनंतर अखेर व्हाट्स अॅपची सेवा सुरळीत सुरू झाली अन वापरकर्त्यांचा जीव भांड्यात पडला. व्हाट्सअॅप आता अनेकांचे संवाद साधण्याचे प्रमुख माध्यम झाले आहे. जगभरात कोट्यवधी लोक व्हाट्सअॅपच मेसेंजर अॅपचा वापर करतात.. मात्र आज दुपारी व्ह़ॉट्स अँपची सेवा विस्कळीत झाल्याने अनेकांना मनस्ताप झाला होता.
आज दुपारी अचनाक व्हाट्स अॅपची सेवा विस्कळीत झाली होती. व्हाट्स अँपवरून कोणताही मेसेज शेअर होत नव्हता. दुपारी 12.45 वाजता व्हाट्स अॅपचा सर्व्हर डाऊन झाला. ही सेवा देशातच नाही तर जगभरात विस्कळीत झाली. मध्य पूर्व, युरोप आणि दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये व्हाट्सअॅपची सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर अनेकांनी ट्विटरवर त्यांची समस्या मांडली. ट्विटरवर पर #whatsappdown ट्रेंड सुरू केला. तसेच शोशल मीडियावर देखील लोकांनी मोठ्याप्रमाणात मीम्स व्हायरल केले होते. एकीकडे लोक या समस्येने हैराण झाले असताना दुसरीकडे सोशल मीडियावर लोक मीम्सव्दारे जोक देखील व्हायरल केले.

हे सुद्धा वाचा :

diwali wishes: समीर वानखेडे, क्रांती रेडकर यांच्या घरी रामदास आठवलेंची खास भेट; वाचा काय म्हणाल्या क्रांती रेडकर

Thane News : मुख्यंमंत्र्यांच्या ठाण्यात दिवाळीला ग्रहण! एकाच दिवसांत फटाक्यांमुळे 11 ठिकाणी आग

High Court News : अपघातात अपंगत्व आलेल्या व्यक्तींसाठी मुंबई उच्च न्यायालयाने घेतला महत्वाचा निर्णय

व्हाट्स अॅप सेवा विस्कळीत झाल्यानंतर मेटा कंपनीकडून सांगण्यात आले की, सेवा विस्कळीत झाल्याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. लोकांना मेसेज पाठविण्यास अडचणी येत आहेत. मात्र आम्ही लवकरात लवकर ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला आशा आहे की, येत्या एक-दोन तासांमध्ये आम्ही सेवा सुरळीत करू.
दरम्यान ज्या लोकांना लॅपटॉप किंवा पीसीला व्हाट्स अँप कनेक्ट करायचे आहे त्यांना लॅपटॉप किंवा पीसीला व्हाट्स अँप कनेक्ट करण्यास अडचणी येत होत्या. जगभरात कोट्यवधी लोक मेसेज, फोटो, व्हिडीओ पाठविण्यासाठी व्हाट्स अँपचा वापर करतात. आयफोन, अॅँड्रॉईड फोन, लॅपटॉप, पीसीला देखील व्हॉट्स अॅप चालते. तांत्रिक समस्यांवर काम करणारी संस्था डाऊन डिटेक्टर (downdetector)ने सांगितले की लोकांना मेसेज पाठविण्यास अ़़डचणी येत होत्या. मागील वर्षी देखील फेसबुकच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने व्हाट्स अॅपची सेवा विस्कळीत झाली होती.
सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
आज दुपारी व्हॉट्सअॅप सेवा आज कोलमडली त्यामुळे जगभरातल्या कोट्यवधी युजर्सचा खोळंबा झाला. त्यानंतर ‘लवकरात लवकर व्हॉट्सअॅप सेवा सुरू करू’, असं स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपकडून देण्यात आले होते. दरम्यान नेटकऱ्यांनी मात्र मीम्सचा पाऊस पाडला.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!