33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeटेक्नॉलॉजीWhatsApp वर दिसणार 'हे' पाच नवे मजेदार फिचर्स, वाचा....

WhatsApp वर दिसणार ‘हे’ पाच नवे मजेदार फिचर्स, वाचा….

टीम लय भारी 

एकमेकांशी सहज, जलद संवाद साधण्यासाठी आपण सारेचजण व्हाट्सअॅपचा वापर करतो, अगदी इंस्टंट मेसेजिंग अॅप म्हणूनच आपण याकडे पाहतो. व्हाट्सअॅपचे करोडो यूजर्स आहेत, त्यांना या अॅपमध्ये नवनवीन चॅटिंग एक्सपीरिअन्स देण्यासाठी कंपनीसुद्धा यूजर्सना नवनवीन फिचर्सच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करीत असते. दरम्यान गेल्या काही दिवसांत कंपनीने काही नवे फिचर्स यूजर्ससाठी आणले आहेत. त्यामध्ये क्विक रिएक्शन, पास्ट पार्टिसिपेंट्स फीचर, केप्ट मेसेज, वॉइस मेसेज आणि अनरीड चॅट फील्टर असे पाच भन्नाट फिचर्स आणले आहेत.

स्टेटसवर क्विक रियाक्शन

बऱ्याचदा काही विशेष घडले की आपण त्याचे फोटो स्टेटसवर अपलोड करतो मग त्यावर लोक मेसेच पाठवत प्रतिक्रिया नोंदवतात, मात्र आता तुम्हाला स्टेटसवर क्विक रियाक्शन देता येणार आहे. हा फिचर्स इन्टाग्राम आणि फेसबूकवर उपलब्ध आहे. त्यामुळे आता सहजपणे तुम्ही तुमच्या रियाक्शन व्हाट्सअॅपवर देऊ शकता.

पास्ट पार्टिसिपेंट्स फीचर

सध्या WhatsAppवर पार्टिसिपेंट्स नावाच्या फीचरचं सुद्धा टेस्ट करणे चालू आहे. हे फीचर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपसाठी असून ग्रुपच्या सर्व मेंबर्सला मागील 60 दिवसात कोणी ग्रुप सोडला आहे हि माहिती यातून कळणार आहे. कोण ग्रुपमध्ये सहभागी होते, कोणी ग्रुप सोडले यासंबंधी संबंधी सुद्धा युजर्सना कळणार आहे.

केप्ट मेसेज फीचर

WhatsAppमध्ये केप्ट मेसेज फीचर सुद्धा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे फीचर डिसअपेरिंग मेसेज दरम्यान काम करणार आहे. व्हाट्सअॅपवर डिसअपेरिंग मेसेज फीचर चालू केल्यास ठराविक कालावधीनंतर डिलीट होतात, सेव्ह करता येत नाहीत परंतु आता यावर उपाय म्हणून केप्ट मेसेज फीचर सुरू करण्यात येणार आहे.

वॉइस मेसेज फीचर

या फिचरमध्ये यूजर्सला WhatsApp स्टेट्समध्ये शॉर्ट वॉइस नोट्स अ‍ॅड करता येणार आहे. हे फीचर अँड्राइड बीटा व्हर्जन २.२२.१६.३ वर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याचा एक स्क्रीनशॉट देखील समोर आला असून, यात एडिट व कॅमेरा आयकॉनसह स्टेट्ससह विंडो खाली माइकचा सुद्धा पर्याय दिसून येत आहे. यामध्ये वॉइस नोट रेकॉर्ड करून कॅप्शनसह अपलोड करता येणार आहे.

अनरीड चॅट फिल्टर

सुरवातीला बीटा व्हर्जनवर या फीचरचे टेस्टिंग करण्यात आले परंतु नंतर ते हटवण्यात आले. आता पुन्हा एकदा हा फिचर्स व्हाट्सअॅप यूजर्ससाठी घेऊन येणार आहे. यामध्ये रीड केलेले व अनरीड चॅट फिल्टर करता येणार आहेत, तर तुम्ही जे मेसेज वाचले नाहीत, ते एकाच ठिकाणी मिळतील.

हे सुद्धा वाचा…

शिवसेनेच्या काही बंडखोरांसाठी उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख

हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, संदेशात ‘पक्षप्रमुख’ म्हणणे टाळले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी