26 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरटेक्नॉलॉजीकाय....? डासांपासून होणार आता लवकरच सुटका

काय….? डासांपासून होणार आता लवकरच सुटका

टीम लय भारी 

 पाॅंडेचेरी : देशभरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसामुळे होणारी पळापळ, चिखलामुळे होणारी चिडचिड आणि त्याहीपेक्षा पावसामुळे होणारा डासांचा त्रास हा सर्वश्रृत आहे; परंतु यापैकी जास्त त्रासदायक असणाऱ्या डासांपासून सूटकाच मिळाली तर..? होय. देशात यावर एक अनोखं संशोधन झालं असून यामध्ये एका विषाणूच्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे जो डासांना नष्ट करतो.

संशोधनात भारत देश नेहमीच अग्रेसर असल्याचे दरवेळी पाहायला मिळते. देशातील असे अनेक नवनवीन अचंबीत करणारे प्रयोग अगदी सर्वसामान्यांमध्ये सुद्धा चर्चेचे आणि कुतुहलाचे विषय ठरत असतात. पाॅंडेचेरी येथील ICMR म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद या संशोधन केंद्राने एका विषाणूच्या प्रजातीचा शोध लावला असून यामध्ये हे विषाणू डास आणि काळ्या माश्यांची अंडी नष्ट करत असल्याचे सिद्ध झाले आहे.

बीटीआय (Bti strain VCRC B-17) प्रजातीचा हा विषाणू असून त्यापासून पर्यावरण व इतर प्राणी यांना कोणताच धोका संभावत नाही. मुख्यतः डास मारण्यासाठी या विषाणूचा वापर करण्यात येतो. याविषयी बोलताना संशोधन केंद्राचे संचालक डॉ. अश्वनी कुमार म्हणाले, “या विषाणूचं वैशिष्ट्य असं की हा विषाणू इतर कोणत्याही कीटकांना, किंवा प्राण्यांना इजा पोहोचवत नाही. तो फक्त डास आणि काळ्या माश्यांची अंडी नष्ट करतो. विषाणूच्या या प्रजातीची पूर्णपणे चाचणी केलेली आहे आणि तिला आता भारतीय प्रजातीचा दर्जाही दिला आहे. आत्तापर्यंत या तंत्रज्ञानाचा परवाना 21 कंपन्यांना देण्यात आला आहे.”

दरम्यान देशभरात चिकनगुनिया, मलेरिया, फिलारियासिस, डेंग्यू, झिका असे अनेक आजार डासांमुळेच होतात, ज्यामुळे अनेजण यामध्ये बळी पडतात, या संकटावर अशा अनोख्या विषाणूचा शोध वरदानच ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

नगरपालिकांच्या निवडणुकांना ग्रहण; निवडणुका पुढे ढकलण्यासाठी भाजपचा पुढाकार

हवामान खात्याचा अंदाज सरस, ‘या’ ठिकाणी होणार ढगफुटी; वाचा सविस्तर…

अमित शहांच्या घरी खासदारांची गुप्त बैठक

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!