32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeटेक्नॉलॉजीGITA GPT: जीवनातील समस्यांवर भगवद्गीतेचा AI उपाय?

GITA GPT: जीवनातील समस्यांवर भगवद्गीतेचा AI उपाय?

श्रीमद् भगवद्गीता हे हिंदूंच्या पवित्र पुस्तकांपैकी एक आहे. महाभारतानुसार भगवान कृष्णाने कुरुक्षेत्र युद्धामध्ये अर्जुनाला सांगितलेल्या जीवनाचा अर्थ या गीतेमध्ये अगदी इत्यंभूतपणे मंडला आहे. धर्माऐवजी जीवनाकडे असलेल्या तात्विक दृष्टिकोनामुळे, भगवद्गीता सध्या केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या अनुप्रयोगात आता श्री कृष्णाच्या माध्यमातून गीता जीपीटी (Gita GPT) ही वापरकर्त्यांना दैनंदिन समस्यांसाठी गीतेचा सल्ला घेण्यास प्रोत्साहित करत आहे. (Bhagavad Gita’s AI solution to life’s problems?)

AIच्या आधुनिक युगात जगप्रसिद्ध भगवद्गीतेनेसुद्धा प्रेरित होऊन अशाच AI साधनांवर लक्ष केंद्रित केले. जेथे जीवनाचा अर्थ गीतेतून सरळ सोप्या भाषेत स्पष्ट केला आहे. चॅट जीपीटी आणि गीता जीपीटी ची आपण येथे तुलना केली तर, चॅटजीपीटी हा मुळात व्हर्च्युअल रोबोट (चॅटबॉट) आहे. जो विविध प्रश्नांची उत्तरे देतो, लिहिण्याचं काम करतो, अस्खलितपणे संभाषण करतो आणि वैयक्तिक समस्यांवर सल्ला देखील देतो. तर गीता जीपीटीमध्ये जीवनाचे सार आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असलेल्या श्रीमद् भगवत गीतेतून आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांचा खुलासा करण्यासाठी श्री कृष्णाचे AI मार्गदर्शन लाभत आहे.

Image

प्रथम ChatGPT-OpenAI चॅटबॉट होता जो इंटरनेट सेन्सेशन ठरला. यानंतर आता शेकडो स्टार्टअप्स एआय या ट्रेंडवर उडी मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. याच दरम्यान हिंदू धर्मग्रंथाने प्रेरित AI ॲप्सची संख्या मार्केटमध्ये अचानक वाढली आहे. यांपैकी किती ॲप्स यशस्वी झाले आणि किती मार्केटमध्ये बुडाले याचे गणित फार मोठे आहे. यासाठी वापरकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारची नकारात्मक प्रतिक्रिया नाही. मात्र हिंदू धर्माचा हा वाढता बाजार थांबविला पाहिजे. परिणामी मुळ संकल्पना हरवून जाण्याची गंभीर भीती तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

मुळात गीता जीपीटी ही गुगल इंडियाचे सॉफ्टवेअर अभियंता सुकुरु साई विनीत यांची कल्पना आहे. हे ॲप लोकांना प्रश्न विचारण्याची परवानगी देतो ज्यांची उत्तरे AI चॅटबॉट भगवद्गीतेचा सल्ला घेऊन देते. गीता हा एक हिंदू धर्मग्रंथ आहे जो अर्जुन आणि त्याचा सारथी, भगवान कृष्ण यांच्यातील संवादाचे अनुसरण करतो. यात युद्धाच्या नैतिकतेपासून ते देव आणि स्वतःचे स्वरूप, तात्विक वादविवादांपासून ‘धर्म’ च्या अर्थापर्यंत आणि बरेच काही विषयांचा समावेश आहे.

विशेषतः गीता जीपीटी वापरकर्त्यांना दैनंदिन समस्यांसाठी गीतेचा सल्ला घेण्यास परवानगी देते. उदाहरणार्थ, कोणीतरी चॅटबॉटला ब्रेकअप कसे हाताळायचे याबद्दल सल्ला विचारू शकतो आणि ते सर्वात संबंधित श्लोकांसह शास्त्रातील मजकूराचे उत्तम विश्लेषण करतो.

भगवद् गीतेशी प्रेरित इतर AI साधने
इतर अनेक AI ॲप्स आहेत जे वापरकर्त्यांना गीतेच्या शिकवणीत मदत करण्याचा दावा करतात. https://gita.kishans.in वर, उदाहरणार्थ, ॲप भगवान कृष्णाची भूमिका घेते तर वापरकर्ता अर्जुन सल्ला विचारत असतो. त्याचप्रमाणे www.bhagavadgita.ai हे आणखी एक साधन आहे जे वापरकर्त्यांना त्यांना भेडसावणाऱ्या कोणत्याही समस्येवर सल्ला घेण्यासाठी “कृष्णाला विचारू” असे पर्याय देते.  www.gitagpt.in स्वतःला OpenAI च्या GPT-3 द्वारे समर्थित क्रांतिकारक चॅटबॉट म्हणून ओळखतो. गीता GPT सह, तुम्ही तुमच्या जीवनातील निर्णयांमध्ये सहज, संवादात्मक मार्गाने अंतर्दृष्टी आणि स्पष्टता मिळवू शकता, असे हे ॲप वचन देते.

हे सुद्धा वाचा :

पाच ट्रेंडस् जे बदलवून टाकतील आपले ऑनलाईन जीवन

चॅटजीपीटी एआय चॅटबॉट्समुळे Gmailच्या शेवटाची घटिका समीप; जीमेल निर्माते पॉल बुचेट यांचा महाभयंकर इशारा

WhatsApp चॅट तुम्ही लपवू शकता, ही सोपी ट्रिक माहित आहे का?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी