31 C
Mumbai
Thursday, November 17, 2022
घरटेक्नॉलॉजीJio Recharge : जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

Jio Recharge : जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

तुम्ही जर Jio यूजर असाल तर तुमच्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे. हल्ली काहींना तर दिवसाला 2gb डेटा देखील कमी पडू लागला आहे. त्याचसाठी आम्ही तुम्हाला असा एक रिचार्ज प्लान सांगणार आहोत, ज्यामध्ये फक्त 75 रुपयांमध्ये 23 दिवस कॉलिंग आणि डेटाची व्यवस्था केली गेली आहे.

तुम्ही जर Jio यूजर असाल तर तुमच्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे. कारण सध्याच्या जीवनात व्यक्तीला फोन आणि त्या फोनमध्ये इंटरनेट पॅक हा किती महत्वाचं आहे हे सांगणे गरजेचे नाही. हल्ली काहींना तर दिवसाला 2gb डेटा देखील कमी पडू लागला आहे. त्याचसाठी आम्ही तुम्हाला असा एक रिचार्ज प्लान सांगणार आहोत, ज्यामध्ये फक्त 75 रुपयांमध्ये 23 दिवस कॉलिंग आणि डेटाची व्यवस्था केली गेली आहे. वास्तविक हा Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान आहे. जो 75 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये दररोज मोफत डेटा आणि कॉलिंग सुविधा देण्यात आली आहे. जर तुम्ही सरासरी डेटा वापरकर्ता असाल, तर Jio चा 75 रुपयांचा प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. चला तर जाणून घेऊयात या 75 रुपयांच्या प्लॅनची सविस्तर माहिती.

तुम्ही Jio च्या वेबसाइटवरून Jio चा 75 रुपयांचा प्लान रिचार्ज करू शकता. तसेच, तुम्ही My Jio अॅपवरून या प्लॅनचा रिचार्ज सुद्धा करू शकता. याशिवाय, जिओचा 75 रुपयांचा प्लॅन Google Pay सह इतर अनेक थर्ड पार्टी अॅप्सवरूनही रिचार्ज केला जाऊ शकतो. त्यामुळे दिवसातील तुमचा रिचार्ज संपला असेल तर ७५ रुपयांचा हा प्लॅन मात्र त्यासाठी अगदी योग्य आहे.

Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनचे फायदे
जिओच्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 23 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. तसेच, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 100MB डेटा दिला जातो. तर 200MP डेटा पूर्ण वैधतेसह ऑफर केला जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर, 23 दिवसांत वापरकर्त्यांना एकूण 2.5 GB डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड मर्यादा 64kbps पर्यंत घसरते. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते. तसेच 50 एसएमएस सुविधा देण्यात आली आहे. जर आपण इतर फायद्यांबद्दल बोललो तर, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना मोफत डेटा आणि कॉलिंगसह Jio TV, Jio Cinema, Jio Cloud, Jio Security चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर केले जाते.

हे सुद्धा वाचा

Aadhar Card Pan Card Link : 31 मार्च पूर्वी ‘हे’ काम करून घ्या अन्यथा पॅन कार्ड उपयोगाचे राहणार नाही!

Yoga Foundation Course : मोरारजी देसाई इन्स्टिट्यूटमधील योग विज्ञान फाउंडेशन अभ्यासक्रमासाठी नोंदणी सुरू! अशाप्रकारे करा अर्ज

Whatsapp Features : व्हॉट्सऍपवरील आपत्तिजनक फोटो, व्हिडिओ असे करू शकता ब्लॉक

जिओचा 125 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे, 125 रुपयांच्या प्लॅनमध्ये 23 दिवसांची वैधता देखील दिली जाते. या प्लॅनमध्ये दररोज 500MB डेटा दिला जातो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय Jio TV, Jio Cinema, Jio Cloud, Jio सिक्युरिटीचे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर केले जाते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!