28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeटेक्नॉलॉजीGoogle : भारतातील 'ऑनलाईन' सुरक्षेसाठी गुगल झाले सज्ज

Google : भारतातील ‘ऑनलाईन’ सुरक्षेसाठी गुगल झाले सज्ज

भारतात देखील अनेक व्यवहार हे डिजिटल माध्यमातून होत आहेत. मात्र अनेक वेळा माहिती नसल्यामुळे चुका होता. त्यामुळे नुकसान देखील सहन करावे लागते. त्यासाठीच गुगलने कंबर कसली आहे.

जगभरात आता बहूतेक सर्व व्यवहार हे डिजिटल माध्यमांतून होत आहेत. भारतात देखील अनेक व्यवहार हे डिजिटल माध्यमातून होत आहेत. मात्र अनेक वेळा माहिती नसल्यामुळे चुका होता. त्यामुळे नुकसान देखील सहन करावे लागते. त्यासाठीच गुगलने कंबर कसली आहे. गुगल तुमच्या दारात येऊन अनेक डिजिटल व्यवहार कसे करावे ते रोड शोच्या माध्यमातून सांगणार आहे. गुगलने वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी काही उपाय योजना केल्या आहेत. भारतातील ऑनलाईन सुरक्षेसाठी गुगल (google) सज्ज झाले आहे. नुकतेच ‘सेफर विथ’ गुगलच्या दुसऱ्या एडिशनचे अयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये भारतामधील ऑनलाईन सुरक्षेसाठी काही महत्वाच्या उपाय योजना केल्या आहेत.

वाढत्या डिजिटलीकरणामुळे ऑनलाईन व्यवहारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यासाठी गुगलने ऑनलाईन सेफ्टी कँपेनचे आयोजन केले होते. ज्यामध्ये भारतामधील काही शहरांमध्ये सायबर सुरक्षेसंदर्भात रोड शोंचे आयोजन करण्यात येणार आहे. गुगलकडून ऑनलाईन सुरक्षेसाठी सुमारे 2 मिलीयन डॉलर म्हणजे 19 करोड रुपये खर्च केले जाणार आहेत.
या माध्यमातून महिला, छोटे व्यापारी, वर‍िष्ठ नागरिकांना सतर्क करता येणार आहे. गुगल इंडियाचे उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी सांगितले की, भारत डिजिटल अर्थव्यवस्था बनवण्यामध्ये आग्रेसर आहे. त्याचबरोबर ऑनलाईन सुरक्षा देखील अत्यंत महत्वाची आहे.

हे सुद्धा वाचा

session : अखेर आजच्या अधिवेशनात ‘नामांतराला’ संमती मिळाली

Transgender :आता तृतीयपंथींना देखील मिळणार केंद्र सरकारकडून आरोग्य सुविधा

Terrorist : दहशतवादी केवळ 30 हजार रुपयांत उडवणार होते भारतातील पोस्ट ऑफ‍िस

देशातील डिजिटल व्यवस्था सुरक्षीत करायची आहे. गुगलने (google) देशभरात 1,00,000 डेव्हलपर्स, आईटी आण‍ि स्टार्टअपसाठी सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी रोड शोचा निर्णय घेतला आहे. कंपनीने इंटरनेट युजर्सना सेफ्टी डिजिटल देण्या घेण्याच्या व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.

आयटी मंत्रालय‍ आणि डिजिटल इंडिया कॉरपोरेशनने ही योजना भारतामधील अनेक भाषांमध्ये राबवण्याचा न‍िर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच हे अभ‍ियान भारतात राबविण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सगळीच माणसं शिकलेली नसतात. त्यामुळे प्रत्येकाला डिजिटल व्यवहार करता येईल याची खात्री देखील नसते. अनेकदा तर आर्थ‍िक व्यवहार करतांना फसवणूक देखील होते. भारतात डिजिटायजेशननंतर सायबर गुन्हेगारी फोफावली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी