29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeटेक्नॉलॉजीमेड इन इंडिया 'BharOS'ला सरकारचा ग्रीन सिग्नल, अँड्रॉइडची होणार सुट्टी

मेड इन इंडिया ‘BharOS’ला सरकारचा ग्रीन सिग्नल, अँड्रॉइडची होणार सुट्टी

गेल्या काही वर्षांत भारताने जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. भारताने आता अनोखी कामगिरी करत एक नवीन मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम बनविली आहे. म्हणजेच फोनमध्ये अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (IOS) सारख्या ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर करण्याऐवजी आता ‘मेड इन इंडिया’ सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार आहे. बर्‍याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या या ऑपरेटिंग सिस्टिमला (भरोस) BharOS असे नाव देण्यात आले असून सरकारने या प्रणालीला ग्रीन सिग्नल दिला आहे. (Made in India BharOS will break Android, the government has given a green signal)

भारतातील स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम ‘भरोस’ची यशस्वी चाचणी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. पीआयबी हिन्दी या ट्विटर हँडलद्वारे याची माहिती देण्यात आली.

विशेष म्हणजे ‘भरोस’ ही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम IIT मद्रासशी संबंधित एजन्सीने तयार केली आहे आणि कोणत्याही मूळ ओरिजिनल ईक्विपमेंट मॅनुफॅक्चेररद्वारे याला मोबाइल डिव्हाइसचा भाग बनवता येईल. नवीन मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम भरोस हे आयआयटी मद्रासच्या सहकार्याने JandK ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेडने या कंपनीने तयार केले आहे. कोणत्याही व्यावसायिक हँडसेटमध्ये ते आरामात वापरता येईल, असा दावा केला जात आहे. डेव्हलपर्सच्या मते, या ओएस च्या मदतीने वापरकर्त्यांना फोन वापरताना चांगली गोपनीयता आणि सुरक्षा मिळेल, फीचर्सच्या बाबतीत तो थेट अँन्ड्रॉइडला टक्कर देऊ शकतो.

हे सुद्धा वाचा : सेंट्रल व्हिस्टा : भारताच्या नवीन संसद भवन इमारतीची एक्स्ल्युझिव्ह छायाचित्रे 

अमेरिकेत राहण्यासाठी हजारो भारतीय आयटी कामगार करताहेत रोजगार संघर्ष

यंदा भारत होणार जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश; गेल्या 60 वर्षात प्रथमच घटली चीनची लोकसंख्या!

प्री-इन्स्टॉल ॲप्स उपलब्ध नसतील 
भरोस (BharOS) देशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतेही डीफॉल्ट ॲप्स (NDA) समविष्ठ नाही. म्हणजेच फोनमध्ये ॲप्स आधीच स्थापित केले जाणार नाहीत. जेणेकरून फोनमध्ये अँन्ड्रॉइडपेक्षा जास्त स्टोरेज स्पेस उपलब्ध आहे. वापरकर्त्यांना जे ॲप ते वापरू इच्छित नाही, असे कोणतेही ॲप फोनमध्ये ठेवण्याची किंवा वापरण्याची सक्ती केली जात नाही. त्या तुलनेत अँड्रॉइड फोनमध्ये अनेक ॲप्स आधीच प्री-इन्स्टॉल केलेले असतात.

सॉफ्टवेअर अपडेट्स मिळत राहतील
विकासकांनी सांगितले की, BharOSला नेटीव ‘ओव्हर द एअर’ (OTA) अपडेट्स देणार आहेत. म्हणजेच, कोणत्याही प्रकारच्या दीर्घ प्रक्रियेतून न जाता, नवीनतम सॉफ्टवेअर आवृत्ती फोनमध्ये स्वयंचलितपणे स्थापित होईल. हे ओएस प्राइवेट ॲप स्टोअर सर्व्हिसेस (PASS) सह विश्वसनीय ॲप्स स्थापित करण्यास सक्षम असेल आणि ते मालवेअर किंवा अशा धोक्यांपासून पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करेल. तथापि, सुरुवातीला BharOS चा वापर फक्त त्या एजन्सींद्वारे केला जाईल ज्यांना अधिक गोपनीयतेची आवश्यकता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी