33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeटेक्नॉलॉजीखबरदार! गुगलवर 'हे' सर्च करत असाल तर होणार कारवाई

खबरदार! गुगलवर ‘हे’ सर्च करत असाल तर होणार कारवाई

टीम लय भारी

कोणतीही माहिती शोधायची झाल्यास गुगल क्लीककडे बोटं आपोआप वळतात. परंतु माहितीचे भंडार असलेले सर्वश्रृत गुगल आता सगळ्याच कारणासाठी वापरता येणार नाही. तुम्हाला प्रश्न पडला ना? पण हे खरंय. असे काही विषय जे जीवितास, समाजास घातक ठरू शकतात, असे पर्याय गुगलवर यापुढे सर्च करता येणार नाहीत. तरीही हट्टाने सर्च केल्यास संबंधित व्यक्तीला कठोर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे, त्यामुळे गुगल सर्च करताना प्रत्येकाने ही खबरदारी घ्यायलाच हवी.

सर्वसामान्यपणे ‘सर्च इंजिन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुगलवर आपण जी माहिती हवी ती लगेचच सर्च करून मिळवतो आणि त्या पद्धतीने पुढचे काम पुर्ण करतो. परंतु बाॅम्ब कसा बनवायचा, गर्भपात आणि चाईल्ड पोर्नोग्राफी असे विषय जे घातक परिणाम करू शकतात ते सर्च करणे शक्यतो टाळावेच. सर्च करूच नये असे म्हणणे योग्य ठरेल कारण तसे केल्यास कारवाईचा दंडुका कधी डोक्यावर पडेल हे सांगता येत नाही.

‘हे’ पर्याय का सर्च करू नये?

बाॅम्ब बाबत कोणी गुगल सर्च केल्यास तडक पोलिस कारवाई होऊ शकते. बाॅम्ब तयार करणे हा अपराध मानला जातो, मात्र त्याबाबत केवळ सर्च जरी केला तरीही सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर तुम्ही सहजपणे येऊ शकता. समाजविघातक कृत्याअंतर्गत तुम्हाला जेलमध्ये जावे लागू शकते.

अनावधानाने किंवा गंमत म्हणून जरी चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधीत सर्च केल्यास तुम्हाला मोठ्या कारवाईस सामोरे जावे लागू शकते, कारण याबाबत भारत सरकारकडून कठोर कायदे करण्यात आले असून कोणी सापडलेच तर त्याला पाच ते सात वर्षांचा कारावास होऊ शकतो.

भारतात सरकारकडून गर्भपात संदर्भात सुद्धा कठोर कायदे लागू करण्यात आलेले आहेत आणि याच विषयी कोणी गुगल सर्च केल्यास लगेचच कारावास होऊ शकतो. गर्भपात करायचे असल्यास डाॅक्टरांचे योग्य मार्गदर्शन हवे केवळ गुगल सर्च केल्यास जीवीतास धोका उद्भवू शकतो.

त्यामुळे गुगल जसे तुम्हाला माहिती उपलब्ध करून तुमचे जीवन बनवू शकते तसे शोधलेल्या चूकीच्या माहितीने बिघडवू सुद्धा शकते म्हणून सहज उपलब्ध होणाऱ्या गुगल सर्चवर काळजीपुर्वक गोष्टी करायला हव्यात. गुगलचे नियम पाळायला हवेत. नाही का?

हे सुद्धा वाचा…

VIDEO : पुरात वाहून चाललेल्या माणसाला हत्तीच्या पिल्लाने वाचवले

अरेरे…! पंडीत नेहरूंनी एके काळी स्वतःचे घर पक्ष कार्यालयासाठी दिले, त्याच कार्यालयाचे वीज भरण्यासाठी पक्षासाठी पैसे नाहीत!

बंडखोर सेना आमदाराला मुंबईत आल्यानंतर चार दिवसांनंतर दिसला मतदारसंघ!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी