31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeटेक्नॉलॉजीट्विटरची नवी चिमणी पाहिलीत का?

ट्विटरची नवी चिमणी पाहिलीत का?

एलॉन मस्क यांनी ट्विटर अधिग्रहीत केल्यावर त्यांनी अनेक बदल केले आहे. आता त्यांनी ट्विटरचा ब्ल्युबर्डचा लोगो बदलला असून त्या एवजी डोगेचा फोटो ठेवला आहे. मस्क यांच्या या निर्णयामुळे युजर्स हैराण झाले आहेत.

जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अधिग्रहीत केल्यावर एलॉन मस्क चर्चेत आले होते. ट्विटरची धुरा सांभाळताच त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयामुळे वापरकर्त्यांना बुचकळ्यात टाकले होते. त्यांच्या सुरवातीला त्यांनी वॉशबेसिन घेऊन ते ट्विटरच्या कार्यालयात आले होते. यानंतरही त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयामुळे ते चर्चेत राहिले होते. दरम्यान, त्यांनी ट्विटरची ओळख असलेला ब्ल्यु बर्ड लोगो बदलण्याचा निर्णय घेतला असून त्या एवजी डोगे हा लोगो वापरला जाणार आहे. या बाबतचे ट्विट त्यांनी पोस्ट केले असून त्याचा फोटो देखील उपलोड केला आहे. हा बदल पाहून वापरकर्ते हैराण झालेले पाहायला मिळत आहेत. यावर ट्विटरवर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.

आज पहाटे ट्विटर ओपन केल्यावर अनेक वापरकर्त्यांना धक्का बसला. एलॉन मस्क यांनी थेट ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड हटवून त्या एवजी डोगे हा लोगो लावला. या संदर्भात त्यांनी पोस्ट देखील टाकली आहे. हा बदल ट्विटरच्या वेब पेजवर करण्यात आला असून ट्विटर मोबाईल अॅपवर फक्त ब्लू बर्ड कायम ठेवण्यात आला आहे. ट्विटरचं होम बटण म्हणून दिसणार्‍या ब्लू बर्डऐवजी आता युजर्सना डोगेचं चित्र दिसत आहे. थोड्या वेळापूर्वी हा बदल करण्यात आला आहे.

ट्विटरची नवी चिमणी पाहिलीत का?

हा बदल केल्यावर एलॉन मस्क यांनी एक गमतीशीर पोस्टही शेअर केली. त्यांनी आपल्या अकाउंटवर डॉगे मीम शेअर करत ट्वीटही केले. या ट्वीटमध्ये त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स तपासणाऱ्या एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यानं ट्विटरच्या ब्लू-बर्डचं आयडी कार्ड हातात धरलं आहे. तर कारमध्ये एक डोगे बसला आहे. तो त्या ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याला सांगतोय की, “ड्रायव्हिंग लायसन्सवर असलेला फोटो जुना आहे.”

आयकॉनिक ब्लू-बर्डला हटवून एलॉन मस्क यांनी ठेवलेली डोगे इमेज ही डॉज इमेज शिबू इनू, डॉजकॉइन ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सीचं प्रतीक आहे. 2013 मध्ये इतर क्रिप्टोकरन्सीसमोर एक विनोद म्हणून ही इमेज पुढे आणली होती. दरम्यान एलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता जेथे जेथे निळी चिमणी दिसत होती तिथं तिथं श्वानाचा लोगो दिसत आहे. ट्विटर पेज रिफ्रेश केल्यानंतरही सुरुवातीला हाच श्वानाचा लोगो दिसतो आणि मग होम पेज ओपन होते. ट्विटरच्या साईटवर डावीकडे सर्वात वरच्या बाजूला हा निळ्या चिमणीच्या जागी श्वानाचा लोगो दिसत आहे.

हे सुद्धा वाचा : 

ट्विटर अडचणीत ; एलॉन मस्क यांनी नोकरकपात केल्यानंतर ‘किड्याची’ घुसखोरी

भारतातील ट्विटरच्या दोन कार्यालयांना लागणार टाळे; मस्क यांचा चिंताजनक निर्णय

Mumbai Police : जनतेला सुरक्षितता देणाऱ्या मुंबई रेल्वे पोलिसांचं ट्विटर अकाउंट हॅक!

Twitter logo change; Users shocked by Elon Musk’s decision ,Twitter’s logo change, Elon Musk

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी