30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeटेक्नॉलॉजीव्हॉट्सअॅप आणि ट्रूकॉलरने केली हातमिळवणी

व्हॉट्सअॅप आणि ट्रूकॉलरने केली हातमिळवणी

व्हॉट्सअॅप युझर्सची स्पॅम कॉलपासून सुटका होणार आहे. ट्रूकॉलरचे नवीन फीचर व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलसाठी उपलब्ध असेल. हे वैशिष्ट्य सध्या बीटा टेस्टिंग फेझमध्ये आहे. मे महिन्याच्या अखेरीस ही सेवा सर्वांसाठी सुरू होईल.

व्हॉट्सअॅप आणि ट्रूकॉलरने हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअॅप युझर्सची स्पॅम कॉलपासून सुटका होणार आहे. Truecaller ची कॉलर आयडेंटिफिकेशन सेवा WhatsApp आणि इतर मेसेजिंग अॅप्सवरही उपलब्ध होणार आहे. ट्रूकॉलर आणि व्हॉट्सअॅपच्या या जागतिक भागीदारीचा दोन्ही कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. आतापर्यंत ट्रूकॉलर इंटरनेट कॉल ओळखू शकत नव्हते. आता ही स्वीडीश कंपनी इंटरनेट कॉलवरील स्पॅमिंग ओळखू शकेल.

व्हॉट्सअॅप आणि ट्रूकॉलर भागीदारीमुळे व्हॉट्सअॅप युझर्स आता इंटरनेटवर संभाव्य स्पॅम कॉल शोधण्यास सक्षम असतील. ट्रूकॉलरचे हे नवीन फीचर व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलसाठी उपलब्ध असेल. आतापर्यंत ट्रूकॉलर इंटरनेट कॉल ओळखू शकत नव्हते. ट्रूकॉलर युझर्सना फक्त त्यांच्या टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे प्राप्त होणारे कॉल ओळखता येत होते. आता ट्रूकॉलर इंटरनेटद्वारे व्हॉट्सअॅपआणि सिग्नल सारख्या थर्ड पार्टी अॅप्सवरील इनकमिंग कॉल्स ओळखण्यास युझर्सना मदत करू शकणार आहे.

 

गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सअॅप युझर्ससाठी स्पॅम व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल ही एक मोठी समस्या बनली आहे. यातून लोकांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मे महिन्याच्या अखेरीस ही सेवा सर्वांसाठी सुरू होईल. हे वैशिष्ट्य सध्या बीटा टेस्टिंग फेझमध्ये असल्याचे ट्रूकॉलरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलन मामेडी यांनी सांगितले. मात्र, ही सेवा सुरू होण्याची कोणतीही निश्चित तारीख त्यांनी जाहीर केली नाही.

या वर्षाच्या सुरुवातीला, दूरसंचार नियामकाने एअरटेल , रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडियाला कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे टेलिमार्केटिंग कॉल अवरोधित करण्याचे निर्देश दिले होते. टेलिमार्केटर्स आणि हॅकर्स साध्या फोन कॉल्स, व्हॉट्सअॅप व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलद्वारे वापरकर्त्यांना फसवतात. भारतासह जगभरातील देशांमध्ये अशा कॉलची संख्या वाढत आहे. गेल्या एका महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रमांकांद्वारे स्पॅम आणि फसव्या कॉल्समध्ये वाढ झाली आहे. ट्रूकॉलरच्या 2021 च्या अहवालानुसार, भारतातील वापरकर्त्यांना दरमहा सरासरी 17 स्पॅम कॉल प्राप्त होतात.

हे सुद्धा वाचा :

Whatsapp वापरकर्त्यांसाठी जबरदस्त अपडेट; आता चार मोबाईलमध्ये चालणार एक अकाउंट! जाणून घ्या कसे

Whatsapp Features : व्हॉट्सऍपवरील आपत्तिजनक फोटो, व्हिडिओ असे करू शकता ब्लॉक

WhatsApp वर एकच मेसेज अनेकांना पाठवायचा आहे? या ट्रिकने ग्रुप न बनवता करता येईल काम

व्हॉट्सअॅप आणि ट्रूकॉलरसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. व्हॉट्सअॅप हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. सध्या स्पॅम डिटेक्शन तंत्रज्ञानाद्वारे फसव्या खात्यांवर कारवाई केली जाते आणि या तंत्रज्ञानाद्वारे युझर्सना अशा फसवणुकीची खाती ब्लॉक करण्याची, त्याबाबत तक्रार करण्याची सुविधा देत असल्याचा व्हॉट्सअॅपने दावा केला आहे. ट्रूकॉलरसाठीही भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. ट्रूकॉलरचे अर्ध्याहून अधिक युझर्स एकट्या भारतात आहेत. भारतातील 25 कोटी युझर्स ट्रूकॉलरचा वापर करतात.

WhatsApp True Caller Join Hands, Spam Calls Blocked, Internet Caller Identification, Cyber Crime, Fact Check

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी