34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमुंबईआरे वाचवण्यासाठी ठाकरे बंधूंचे एकमत

आरे वाचवण्यासाठी ठाकरे बंधूंचे एकमत

टीम लय भारी

मुंबईः पुन्हा ‘आरे बचाव‘ ही मोहिम सुरु झाली आहे. माजी पर्यावरण प्रेमी आदित्य ठाकरे यांचा आरे मधील कारशेडला पाहिल्यापासूनच विरोध होता. आता अमित ठाकरेंनी देखील याला समर्थन दिले आहे. त्यामुळे ठाकरे बंधू आरे वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तासूत्रे हाती घेताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यासाठी मेट्रो कारशेड आरेतच होईल असे जाहीर केले. या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडचा रेटा रेटू नका असे म्हटले. शिंदे आणि फडणवीस यांनी आरेत कारशेड करण्याची भूमिका कायम ठेवली. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमी चळवळ तीव्र करण्यात आली आहे.

अमित ठाकरेंची फेसुबक पोस्ट

अमित ठाकरे यांनी फेसबुकला पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, ‘ मेट्रो ‘आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये यासाठी शेकडो तरुण तरुणींना संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं.

पुढे ते म्हणतात, विकास हवाच आहे. पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही याचं भान राजकीय नेत्यांना बाळगायला हवं. नवे मुख्यंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. ही आग्रहाची विनंती मेट्रो प्रकल्पात मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरेवर कशाप्रकारे घाव घातला जात आहे.

हे सुध्दा वाचा:

अष्टपैलू कलाकार ‘सिध्दार्थ जाधव‘चा हटके लूक

राज्यपालांच्या भूमिकेवर वर्षा गायकवाड यांनी साधला निशाणा

‘हरि नरके खालच्या जातीतले; म्हणून त्यांच्या शेजारी घर करु नका‘

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी